Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे आरोग्य तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patil

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत १७ दिवस उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी होणार असून त्याकरिता ते अंतरवाली सराटीतून शासकीय रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

मनोज जरांगे (Manoj Jarange-Patil) यांनी १७ दिवस उपोषण केल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासण्या करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकत त्यांनी तपासणी करण्यासाठी होकार दिला. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंडळातील मंत्री यांच्या विनंतीवरून त्यांनी तपासण्या करून उपचार घेण्यास सहमती दर्शविली.

मराठा आरक्षणासाठी १७ दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या करण्यात येणार आहे. यासाठी मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजी नगरकडे सुसज्ज रुग्णवाहिकेतून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत २५ वाहनाच्या ताफ्यातून शेकडो मराठा समाज बांधव ही रुग्णवाहिकेसोबत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news