नवी दिल्ली:पुढारी वृत्तसेवा – अबकारी कर घोटाळ्यात नाव आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील भाजपचा हल्लाबोल सुरुच असून अलिकडेच भाजपने सिसोदिया यांच्याविरोधात स्टिंग ऑपरेशन केले होते. त्याला आता त्यांनी प्रत्युत्तर देत सीबीआयने तपास करुन चार दिवसांत मला अटक केली नाही तर स्टिंग खोटे ठरेल, असे सांगितले आहे.
भाजपने आपल्या स्टिंग ऑपरेशनचे पुरावे सीबीआयकडे द्यावेत व सीबीआयने तपास करुन मला चार दिवसांत अटक करावी, असे थेट आव्हान शिसोदिया यांनी दिले आहे.
अबकारी कर घोटाळ्यात सीबीआयने शिसोदिया यांना आरोपी क्रमांक एक बनविलेले आहे, हे विशेष. शिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान कार्यालयावर गंभीर आरोप केला. पंतप्रधान कार्यालयातून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात कट रचले जात असल्याचे सांगतानाच शिसोदिया यांनी आपल्यावरील छाप्यांत तपास संस्थेला आक्षेपार्ह असे काहीही सापडले नसल्याचे नमूद केले.
हेही वाचा :