T20 World Cup Ind vs Pak : भारत-पाक हाय व्होल्टेज सामन्याची तिकिटे काही मिनिटांत संपली! | पुढारी

T20 World Cup Ind vs Pak : भारत-पाक हाय व्होल्टेज सामन्याची तिकिटे काही मिनिटांत संपली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup) क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान संघांदरम्यान होणा-या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच या सामन्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री काही मिनिटांतच झाल्याचे समोर आहे आहे.

जरी टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, परंतु या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा क्रिकेटच्या महासंग्रामात आमने-सामने येणार आहेत. हा रोमांचक सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे.

आयसीसीने या स्पर्धेतील सर्व सामन्यांच्या तिकिटांची वेबसाइटद्वारे विक्री सुरू केली आहे. प्रेक्षकांनी पहिली पसंती 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला देली आणि पटापट तिकिटांची खरेदी केली. त्यामुळे काही मिनिटांमध्येच या हायव्होल्टेज सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली. एवढेच नाही तर अतिरिक्त स्टँडिंग रूमची तिकिटे सुद्धा काही क्षणातच विकली गेली. (T20 World Cup)

भारत-पाकिस्तान सामन्याची 5 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. सुपर-12 च्या सामन्यांमध्ये भारत पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सामन्याच्या काही दिवस आधी अधिकृत री-सेल प्लॅटफॉर्म देखील सुरू केला जाईल, जिथे चाहत्यांना वास्तविक किंमतीवर तिकीटांची देवाणघेवाण करता येईल.

केवळ चाहतेच नाही तर भारतीय क्रिकेट संघही या स्पर्धेसाठी तितकाच उत्सुक आहे. अलीकडेच या स्पर्धेसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच होणार असल्याची चर्चा आहे. टीम इंडियाच्या जर्सीचे अधिकृत भागीदार एमपीएल स्पोर्ट्सनेही टीझर जारी करून त्याची झलक दाखवली आहे. या टीझरमध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर दिसत आहेत. संघाचे नवीन अधिकृत किट लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे. 12 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा केली आहे. (T20 World Cup)

टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक..

पहिला सामना : 23 ऑक्टोबर : पाकिस्तानविरुद्ध
दुसरा सामना : 27 ऑक्टोबर : ग्रुप A च्या रनर अप विरुद्ध
तिसरा सामना : 30 ऑक्टोबर : द. आफ्रिकेविरुद्ध
चौथा सामना : 2 नोव्हेंबर : बांगलादेशविरुद्ध
पाचवा सामना : 6 नोव्हेंबर : ग्रुप B च्या विकेत्याविरुद्ध

Back to top button