Sukesh Chandrashekhar case: जॅकलीन, नोरानंतर आता नि‍क्‍कीसह ‘या’ अभिनेत्री ईडीच्या रडारवर? | पुढारी

Sukesh Chandrashekhar case: जॅकलीन, नोरानंतर आता नि‍क्‍कीसह 'या' अभिनेत्री ईडीच्या रडारवर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रींग केसमध्ये तुरंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar case) २०० कोटींच्या घोटाळ्यात जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची चौकशी सुरु आहे. आता या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. जॅकलीन, नोरा फतेहीला महागडे गिफ्ट्स दिल्यानंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, सुकेशने बिग बॉस फेम एक्‍ट्रेस न‍िक्‍की तंबोली आणि चाहत खन्नालादेखील अनेक किमती भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. (Sukesh Chandrashekhar case)

निक्की तांबाेळी

हिंदुस्‍तान टाईम्‍सच्‍या रिपाेर्टनुसार, न‍िक्‍की तांबाेळी ही प‍िंकी इराणीच्या माध्यमातून सुकेशला भेटली होती. मुंबई पोल‍िसांच्या माहितीनुसार प‍िंकी इराणी, सुकेशच्या जवळ आहे. न‍िक्‍कीने पोल‍िसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, प‍िंकीने सुकेश हा साऊथ इंड‍ियन प्रोड्यूसर ‘शेखर’ असल्याचे सांगितले होते. र‍िपोर्टनुसार, न‍िक्‍की त‍िहार जेलमध्ये सुकेशशी दाेनवेळा भेटली होती.

‘एप्रिल, २०१८ मध्ये सुकेशने प‍िंकीला १० लाख रुपये द‍िले होते. यापैकी १.५ लाख न‍िक्‍कीला द‍िले. भेटीत सुकेश चंद्रशेखरने तिला २ लाख रुपये आणि बॅग द‍िली. नि‍क्‍कीचा जबाब १५ डिसेंबर, २०२१ मध्ये नोंदवण्यात आला होता. न‍िक्‍कीने हेदेखील सांगितलं की, तिला प‍िंकीने व्हॉट्स ॲपवर संपर्क क‍ेला होता.

चाहत खन्ना

इतकचं नाही तर निक्कीशिवाय प्रस‍िद्ध टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री चाहत खन्नालादेखील सुकेश हा ‘शेखर रेड्डी’ असल्याचे सांगून भेट घडवून दिली होती. प‍िंकी इराणीने सुकेशला साऊथ इंडियान चॅनेलचा मालक असल्याचे सांगून भेट घडवून दिली होती. त्याचप्रमाणे चाहतने आपल्या जबाबात सांगितले होते की, प‍िंकी इराणीने आपलं नाव एंजेल सांगितलं होतं आणि ती एक टॅलेंट एजेन्सीची मालकीण असल्याचे सांगितले होते.

सोफिया सिंग

टेलिव्हिजन अभिनेत्री सोफिया सिंगलादेखील पिंकी इराणीने कामाच्या बहाण्याने संपर्क साधॆला होता. प्रसिद्ध दक्षिण भारतीय निर्माता शेखरसोबत चांगली कामाची संधी असल्याचे सांगत पिंकीने सोफियाशी संपर्क साधला होता, असेही या रिपाेर्टमध्‍ये म्‍हटलं आहे.

आरुषा पटेल

आरुषा म्हणाली की, ती सुकेश चंद्रशेखरला कधीच भेटली नाही पण त्याच्याशी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क साधला हाेता . ज्यासाठी तिला ५.२ लाख रुपये देण्यात आले. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तिने पिंकी इराणीला त्यातील १ लाख रुपये दिले हाेते, असेही हिंदुस्‍तान टाईम्‍सच्‍या रिपाेर्टमध्‍ये म्‍हटलं आहे.

दरम्यान, विशेष पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी ‘एनआयए’शी बोलताना सांगितले की, “सुकेशकडून जॅकलिनला ज्या भेटवस्तू मिळाल्या, त्याबद्दल आम्ही चौकशी केली. पिंकी इराणी हिलाही यावेळी बोलवण्यात आले होते.”

हेही वाचा : 

Back to top button