मणिपूरसंदर्भातील याचिका सरन्यायाधीशांसमोर दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

file photo
file photo

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – मणिपूर संदर्भातील याचिका सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर दाखल करा, असे निर्देश न्यायामूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने गुरुवारी याचिकाकर्त्याला दिले. (Manipur issue supreme court )

मणिपूरमधील हिंसाचार आणि तेथे महिलांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी विनंती याचिकाकर्ते अॅड. विशाल तिवारी यांनी केली आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात अनेक याचिका प्रलंबित असून शुक्रवारी आपल्या याचिकेचीही सुनावणी घेतली जावी, असा मुद्दा तिवारी यांनी मांडला. त्यावर तुम्ही सरन्यायाधीशांसमोर तुमची याचिका दाखल करा, असे खंडपीठाने तिवारी यांना सुनावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news