Mani Shankar Aiyar’s Daughter : मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या एनजीओवर कारवाई; FCRA परवाना रद्द

Mani Shankar Aiyar’s Daughter : मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या एनजीओवर कारवाई; FCRA परवाना रद्द

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : गृहमंत्रालयाने काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या यामिनी अय्यर यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाणारी सुप्रसिद्ध थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (Think-Tank Centre For Policy Research (CPR)) या एनजीओचा एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act (FCRA)) परवाना (license) रद्द केला आहे. गृहमंत्रलयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही संस्था नियमांचे उल्लंघन करत असल्याने सदरची कारवाई करण्यात आली. थिंक टँक ही दिल्लीतून कार्य करणारी एनजीओ असून यामिनी अय्यर या संस्थेच्या अध्यक्ष तथा सीईओ आहेत. (Mani Shankar Aiyar's Daughter)

गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, FCRA नियमांचे उल्लंघन केल्यामुळे थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा FCRA परवाना निलंबित करण्यात आला आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च हे यापूर्वीही सरकारच्या रडारवर होते. यापूर्वी या थिंक टँकवर आयकर खात्याने धाड टाकली होती. (Mani Shankar Aiyar's Daughter)

२०१६ मध्ये CPR ने FCRA च्या परवान्याचे नूतनीकरण केले होते. यानंतर, कोरोनाच्या काळात थिंक टँक या एनजीओला केंद्र सरकारने एफसीआरए परवान्यासाठी मुदतवाढ दिली. FCRA च्या परवान्याचे 2021 मध्ये नूतनीकरण होणे गरजेचे होते. (Mani Shankar Aiyar's Daughter)

CPR ला फोर्ड फाऊंडेशनसह अनेक देशांकडून परकीय निधी प्राप्त झाला आहे. तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही या एनजीओवर झाला आहे. गृह मंत्रालयाने २०१६ मध्येच तीस्ता सेटलवाड यांच्या सबरंग या एनजीओ परवाना रद्द केला होता.

FCRA परवाना निलंबित केल्यास काय होईल?

थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा FCRA परवाना निलंबित केल्यामुळे या थिंक टँकला परदेशातून कोणताही निधी मिळू शकणार नाही. थिंक टँकला निधी देताना अनेक विदेशी संस्थांची नावे समोर आली आहेत. यामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि ड्यूक युनिव्हर्सिटी यासारख्या संस्थांचा समावेश आहे.

थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च ही विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे मान्यताप्राप्त एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेला भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेकडूनही निधी मिळतो. तसेच अधिका-यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने एफसीआरए अंतर्गत या थिंक टँकला मिळालेल्या देणगीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

थिंक टँक संस्था काय करते?

थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च भारताच्या २१ व्या शतकातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल संशोधन करते. संस्थेच्या वेबसाइटनुसार, भारतातील विचारवंत आणि धोरणकर्ते या संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र येतात आणि धोरणात्मक मुद्द्यांवर निर्णय घेतात. भारताची इको सिस्टीम विकसित करणे हा या प्रयत्नांचा उद्देश असल्याचा संस्थेचा दावा आहे.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news