Mallika Sherawat : ‘हिरोने रात्री ३ वाजता बोलवलं तरी जावं लागेल’

mallikasherawat
mallikasherawat
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देणारी मल्लिका शेरावतची प्रत्येक शैली खास आहे. (Mallika Sherawat) चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स देऊन प्रसिद्धीच्या झोतात असलेली मल्लिका शेरावत खऱ्या आयुष्यात दबंग वृत्तीची आहे. गेल्या काही दिवसांपासून मल्लिका तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा मल्लिका शेरावतने असे काही म्हटले आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. (Mallika Sherawat)

कास्टिंग काउचवर मल्लिका काय म्हणाली?

मल्लिका शेरावतने आता पुन्हा एकदा तिच्या नव्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील काळ्या सत्याची जाणीव करून दिली आहे. मुलाखतीत, मल्लिकाने इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या कास्टिंग काउचबद्दल सांगितले आणि असेही सांगितले की जेव्हा तिने तडजोड करण्यास नकार दिला तेव्हा अनेक प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटले.

मल्लिका शेरावत म्हणाली- सर्व ए-लिस्टर्स नायकांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. कारण मी तडजोड करत नव्हते. त्याला अशा अभिनेत्री आवडतात ज्यांना तो नियंत्रित करू शकतो आणि ज्या त्याच्याशी तडजोड करू शकतात. पण मी तशी नाही. हे माझे व्यक्तिमत्व नाही.

मल्लिका पुढे म्हणाली- 'मी स्वतःला कोणाच्या इच्छेनुसार चालवू शकत नाही. जर रात्री ३ वाजता एखाद्या हिरोने तुम्हाला फोन केला आणि म्हटले – माझ्या घरी या, तर तुम्हाला जावे लागेल, जर तुम्ही त्याच्या चित्रपटाचा भाग असाल आणि त्याच्यासोबत चित्रपट करत असाल. तुम्ही नाही गेलात तर समजा चित्रपटातून बाहेर.'

मल्लिका शेरावतने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवरही निशाणा साधला होता. मल्लिकाने सांगितले की, तिने २००४ मध्ये आलेल्या मर्डर चित्रपटात ज्या प्रकारचे बोल्ड आणि इंटीमेट सीन केले होते, ते दीपिकाने आता केले आहेत आणि तिचे कौतुकही झाले आहे. पण जेव्हा मल्लिकाने असे सीन्स केले तेव्हा तिच्यासाठी अश्लील गोष्टी बोलल्या गेल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news