Maharashtra Rain Update : आज संपूर्ण राज्यात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बॅटिंग

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शनिवार व रविवार हे दोन दिवस बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पश्चिमी वारे पुन्हा बळकट झाल्याने राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. कोकणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील बहुतांश भागात मोठ्या पावसाचा इशारा 16 व 17 सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. यात कोकणात 16 ते 23 तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 16 व 17 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारपासूनच राज्यातील बहुतांश भागात ढग दाटून आले आणि गार वाराही सुटला. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाच्या पट्टा तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतही पावसासाठी अनुकूल असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पाऊस वाढला आहे. कोकणात कमी दाबाची रेषा तयार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी दुपारपासून पावसाळी वातावरण तयार झाले होते.

या जिल्ह्यांत जोर

पुणे, अमरावती, अकोला, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news