MPSC Exam TimeTable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक केले जाहीर

File Photo
File Photo
पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( एमपीएससी )  घेण्यात येणा-या सन 2023 या वर्षातील आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. मार्च ते जून या कालावधीत पूर्व परीक्षा होतील. सरकारी नोकरीसाठी राज्यात एमपीएससीमार्फत परीक्षा घेतली जाते. यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार भरतीसाठी प्रयत्न करत असतात.
जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक अंदाजित आहे असे आयोगाकडून स्‍पष्‍ट करण्यात आले आहे. जाहिरात तसेच परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो. तसेच बदल झाल्यास ते आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गच्या पदांसाठी पूर्व परीक्षा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होतील. आणि जुलैमध्ये मुख्य परीक्षा होईल. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मुख्य परीक्षा सप्टेंबरच्या सुरुवातीला होईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रीतची पूर्व परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात पार पडेल. तर मुख्य परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news