Maharashtra Politics : पडळकरांना राेहित पवारांचे प्रत्त्‍युतर; म्‍हणाले, “टीका करण्‍यासाठीच…”

Rohit Pawar
Rohit Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांना मुळात आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आरक्षणाबाबत मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, अशी बाेचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,"उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी. अन्‍यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. "(Maharashtra Politics)

संबधित बातम्या

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर माध्यमांशी बोलत असताना टीका केली होती. यासंदर्भात त्यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,"राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी."

आता रोहीत पवारांच्या या पोस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.

Maharashtra Politics : काय म्हणाले होते पडळकर?

अजित पवार यांना मुळात आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आरक्षणाबाबत मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली हाेती. अजित पवारांची आमच्याबाबतची भूमिका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान, पडळकरांच्या या टीकेवर अजित पवार यांनी मौन बाळगले अहे. मात्र त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्‍यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना आवरावे. या मंगळसूत्र चोराला बारामतीच्या लोकांनी आधीच त्यांची पात्रता दाखवून दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news