मराठा आंदोलनाची राज्य सरकारला चिंता; मात्र, ओबीसींची नाही : विजय वडेट्टीवार | पुढारी

मराठा आंदोलनाची राज्य सरकारला चिंता; मात्र, ओबीसींची नाही : विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सरकारला मराठा आरक्षण, आंदोलनाची चिंता ज्या प्रमाणात दिसली तशी दहा दिवस झाल्यानंतरही ओबीसी आंदोलनाबाबत नाही, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये , या प्रमुख मागण्यांबाबत राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आता माघार नाही, असा इशारा आज (दि.१८) ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला.

 सरकारने तातडीने ओबीसी आंदोलकांची बैठक घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. सोमवारी संविधान चौक येथून ओबीसी महामोर्चा निघाला. कडक पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा अडविण्यात आल्यानंतर नेत्यांची भाषणे होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, पुरुषोत्तम शहाणे,राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे आदी कुणबी ओबीसी महासंघ पदाधिकारी करीत असून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button