Maharashtra Politics | अंबादास दानवे, भुमरे आणि सत्तार एकमेकांना भिडले, जाणून घ्या बैठकीत काय घडलं?

Maharashtra Politics | अंबादास दानवे, भुमरे आणि सत्तार एकमेकांना भिडले, जाणून घ्या बैठकीत काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा  : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आलेला आहे. याची तालुका निहाय माहिती देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. या मागणी वरून विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, पालकमंत्री भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics :  दानवे,  भुमरे आणि अब्दुल सतार यांच्यात खडाजंगी 

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.७) दुपारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान वेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आलेला आहे. याची तालुका निहाय माहिती देण्यात यावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. या मागणी वरून विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, पालकमंत्री भुमरे आणि अब्दुल सतार यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. या वेळी अंबादास दानवे यांनी पालकमंत्री भुमरे निधी वाटपात अन्याय करत असून हि पालकमंत्री पद तुमची जहागिरी नाही असा आरोप केला. तसेच आपण आक्रमक झालो होतो, मी शिवसैनिक आहे, भुमरे यांनी सोबत काम केले आहे. अन्यथा अन्य काही घडले असता असा दावा देखील केला.

तसेच विरोधी पक्ष म्हणून त्यांनी हे नाटक केले असून हे त्यांचे कामच असल्याचे पालकमंत्री भुमरे यांनी सांगताना सर्वांनाच निधी दिला असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान आ. उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला शिंदे गटाची ऑफर होती, मात्र आपण सोबत गेलो नाही त्यामुळे जाणीवपूर्वक निधी वाटपात आपल्यावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी बैठक संपल्यानंतर केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news