Manipur Violence : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी; जंतर मंतरवर जोरदार निदर्शने | पुढारी

Manipur Violence : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी; जंतर मंतरवर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात केंद्र तसेच मणिपूर सरकारला अपयश आले असून निरपराध लोकांना खुलेआम ठार मारले जात आहे तसेच महिलांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी जंतर मंतरवर केली. पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरच्या मुद्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

मागील तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलेले आहे. आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तेथील परिस्थिती विस्फोटक बनली आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांसाठी लोकांचे प्राण महत्वाचे आहेत की मते?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी यावेळी उपसि्थत केला. पुण्याहून आलेल्या शेकडो कार्यकत्र्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा 

Back to top button