पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे; तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च कालावधीत होईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (दि. 2) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारीदरम्यान, तर बारावीची परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारीदरम्यान घेतली जाणार आहे. महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारावी सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम – 21 फेब्रुवारी ते 19 मार्च
बारावी व्यवसाय अभ्यासक्रम – 21 फेब्रुवारी ते 19 मार्च
बारावी माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा – 20 ते 23 मार्च
दहावीची परीक्षा- 1 मार्च ते 26 मार्च
हेही वाचा