महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर (Mahabaleshwar) पर्यटनस्थळाचा मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक आहे. गेल्या महिन्याच्या प्रारंभी राज्य शासनाने कोरोनाच्या (Corona) संसर्गाचे वाढते प्रमाण तसेच ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन याचा फैलाव रोखण्यासाठी खबदरदारीचा उपाय म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू केले हाेते.
प्रामुख्याने पर्यटनस्थळे बंद बाबत देखील निर्णय घेतल्याने महाबळेशवर पर्यटनस्थळावरील सर्वच प्रेक्षणीय स्थळे देखील बंद करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येथील वेण्णालेक,ऑर्थरसीट पांचगणी येथील टेबल लँड वगळता इतर सर्व प्रक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी खुले करण्यात आली आहेत.
महाबळेश्वर पर्यटनस्थळाचा मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून याची सुरुवात करण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे पालिका अधिकारी व कर्मचारी उपास्थीत होते.
राज्य शासनाने नुकतीच नवीन नियमावली जाहीर केली आहे. यावेळी पर्यटनस्थळे (Tourist places) सुरु करण्याबाबत आदेश काढल्याने पालिकेच्यावतीने आज वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सकाळीच प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून व बोटीची पूजा करून सुरुवात करण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. महाबळेश्वर पर्यटनास आलेल्या पर्यटकांनी वेण्णालेक नौकाविहाराचा आनंद लुटला. वेण्णालेक खुले झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा पर्यटकनाची रेलचेल अनुभवायास मिळणार असून छोटेछोटे व्यापारी व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हे ही वाचलं का