आधार केंद्र बंद असल्याने गैरसोय

As the Aadhaar center in Old Sangvi is closed, the citizens have to resort to help for no reason.
As the Aadhaar center in Old Sangvi is closed, the citizens have to resort to help for no reason.
Published on
Updated on

जुन्या सांगवीतील नागरिकांना विनाकारण मारावे लागतात हेलपाटे

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : जुन्या सांगवीमध्ये महापालिकेच्या कर संकलन इमारतीत काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले आधार सुविधा केंद्र सध्या बंदच असल्याचे चित्र आहे. हे केंद्र बंद असल्याने परिसरातील नागरिकांना आधार कार्ड काढणे अथवा नूतनीकरणासाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत.

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड असणे गरजेचे असते. जसे की, बँकेत खाते काढणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणे, रेशन कार्ड सुविधा आदींसह केंद्रातील विविध योजनांसाठी आधार नंबर असणे गरजेचे असते; जुन्या सांगवीतील कर संकलन इमारतीमधील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

येथील आधार केंद्र काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून ते बंदच असल्याचे दिसून येत आहे. सध्या या परिसरात तेवढे एकच केंद्र असल्याने नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक आधार कार्डमधील माहिती बदलासाठी तसेच अद्ययावत करण्यासाठी या आधार केंद्रात येतात; मात्र ते बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना माहितीअभावी हेलापटे मारावे लागत आहेत. पर्यायी शासकीय आधार केंद्र कासारवाडी आणि औंध पोस्ट कार्यालयात असल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.

येथील केंद्रावर 'आधार केंद्र बंद' असा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे आमची विनाकारण गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शासकीय आधार केंद्र बंद असल्याने ते कधी सुरु होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हे आधार केंद्र सांगवीच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांच्या सोयीचे ठरत होते. त्यामुळे पुन्हा आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

या आधार केंद्रातील मशिन विमाननगर येथील आधार शिबिरासाठी नेण्यात आले आहे. त्यामुळे येथील केंद्र बंद आहे. पुढील आठवड्यात येथील आधार केंद्र सुरू करण्यात येईल.
– स्नेहा तायडे, केंद्र संचालक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news