Lovlina In Asian Games 2023: भारताचे आणखी एक पदक निश्चित; बॉक्सिंगमध्‍ये लव्‍हलिना सेमीफायनलमध्ये

Asian Games 2023: boxer lovelina
Asian Games 2023: boxer lovelina

पुढारी ऑनलाईन डेस्क: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. बॉक्सिंगमध्‍ये लव्हलिना बोर्गोहेन हिने उत्तर कोरियाच्या सुरेऑन सेओंग हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयामुळे  लव्‍हलिनाचे २०२४ मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्‍पर्धेचे तिकीटही निश्चित झाले आहे. (Asian Games 2023)

संबंधित बातम्या:

सामन्‍याच्‍या सुरूवातीपासूनचे लव्‍हलिनाने  जबरदस्त प्रहार करत कोरियाच्या प्रतिस्पर्धीला नामोहरण केले. तिने सेओंगला कमबॅकची संधीच दिली नाही. लव्‍हलिना दोन्ही राऊंडमध्ये तिने २०-१८ अशी आघाडी घेतली. दोन्ही राऊंडमध्ये निर्णायक आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्येही लव्‍हलिनाने आक्रमक खेळी कायम ठेवत आपले वर्चस्व राखत बॉक्सिंगमध्‍ये ७५ किलाे वजन गटात सेमी फायनलमध्ये भारताचे स्‍थान पक्‍के केले. (Asian Games 2023)

आशियाई क्रिडा स्पर्धा २०२३ मध्ये भारताने आत्तापर्यंत ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ३३ पदके मिळवली आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news