![Lovlina In Asian Games 2023](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FLovlina-In-Asian-Games-2023.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगच्या ७५ किलो वजनगटात भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेन हिने फायनलमध्ये स्थान मिळवले. यामुळे बॉक्सिंगमध्ये भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. तसेच सेमिफायनलमधील तिच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकचेही तिकीट मिळाले आहे.(Lovlina In Asian Games 2023)
बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताला किमान रौप्य पदक तरी निश्चित केले आहे. तर प्रीती पवारने महिलांच्या ५४ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. एशियनमध्ये तिरंदाजी क्रिडा प्रकारात भारताने मंगळवारी (दि.३) देशासाठी सुवर्ण सुरुवात केली. (Lovlina In Asian Games 2023)
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत एकूण ६२ पदकांची कमाई करत भारत चौथ्या स्थानी आहे. भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २५ कांस्य पदकाची कमाई केली आहे. पदतालिकेत २७६ पदकांसह चीन पहिल्या स्थानी आहे. जपान १२४ पदकासह दुसऱ्या तर रिपब्लिक १३६ पदकांसह पदतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.