नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद देश पातळीवर उमटले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारचे कान टोचले आहेत. सरकारकडे जाहिरात व प्रसिद्धीसाठी पैसे आहेत पण गरिब रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी पैसे नसल्याची टिका राहुल यांनी केली आहे. ( Nanded Hospital death )
संबधित बातम्या
सोशल माडियावर संतप्त भावना व्यक्त करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे कि, भाजपचा लेखी गरिबांना काही किंमत नाही हेच नांदेडच्या घटनेवर दिसून येते. एका दिवसात २४ जणांचा मृत्यू होणे दुर्दैवी असून काँग्रेस पक्ष मृत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेड प्रकरणाची सर्वंकष चौकशी करावी असे म्हटले आहे. यापूर्वी ठाणे येथे एका दिवसात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नांदेडची घटना घडली आहे. यावरून महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडोरे निघाले आहेत असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. ( Nanded Hospital death )
हेही वाचा :