Lok sabha election 2024 : गलती से मिस्टेक..! राहुल गांधींच्‍या सभेत भाजप उमेदवाराचा फोटो (Video)

चूक लक्षात येताच व्यासपीठावर लावलेल्या  भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो पटकन झाकताना  काँग्रेस कार्यकर्ते.
चूक लक्षात येताच व्यासपीठावर लावलेल्या भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो पटकन झाकताना काँग्रेस कार्यकर्ते.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात शिगेला पोहचली आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात मतदान होणार्‍या मतदारसंघांमध्‍ये दिग्‍गज नेत्‍यांच्‍या प्रचार सभा, रोड शो आणि विविध माध्‍यमांतून प्रचाराचा धुरळा उडला आहे. अशा वेगवान प्रचार मोहिमेत कार्यकर्ते आणि नेत्‍यांची एकच धावपळ उडाली आहे. अशामध्‍ये गोंधळ उडाला नाही तर नवल. असेच काहीसे मध्‍य प्रदेशमधील राहुल गांधी यांची प्रचार सभा घेणार्‍या मांडला लोकसभघ मतदारसंखघात घडलं. निवडणुकीच्या कार्यक्रमापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला .

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांच्‍या आज मध्‍य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील धानोरा आणि शहडोल येथे जाहीर सभा होणार आहेत. येथील फ्लेक्स बॅनरवर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचा फोटोही लावण्यात आल्‍याने एकच गोंधळ उडाला. या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली.

भाजप उमेदवारा फोटो झाकला…

काँग्रेस कार्यकर्त्यांना चूक लक्षात येताच त्यांनी व्यासपीठावर लावलेल्या फ्लेक्समध्ये भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो पटकन झाकून टाकला. त्याचवेळी त्या फ्रेममध्ये काँग्रेसचे आमदार रजनीश सिंह यांचे पोस्टर चिकटवण्यात आले . मंडला येथील काँग्रेसचे आमदार ओंकार सिंह. मरकम विधानसभा निवडणुकीत आदिवासी जागांवर काँग्रेसची स्थिती भक्‍क आहे.

मंडलामध्ये केंद्रीय मंत्री आणि सहा वेळा भाजपचे खासदार फग्गनसिंग कुलस्ते हे माजी मंत्री आणि दिंडोरी-एसटीमधून चार वेळा काँग्रेसचे आमदार ओंकार सिंग मरकाम यांच्या विरोधात उभे आहेत. यंदाही २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असा विश्‍वास भाजप व्‍यक्‍त करत आहेत. त्‍यावेळी कुलस्ते विजयी झाले होते.

मध्य प्रदेश राज्‍यात लोकसभा निवडणूक चार टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला, त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे रोजी होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण 29 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 10 जागा अनुसूजित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर उर्वरित 19 जागा अनारक्षित आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news