Manipur Lok Sabha Election: मणिपुरात ना सभा, ना रोड शो, ना गाजावाजा; लोकसभा पार्श्वभूमीवर शांततेत प्रचार सुरू | पुढारी

Manipur Lok Sabha Election: मणिपुरात ना सभा, ना रोड शो, ना गाजावाजा; लोकसभा पार्श्वभूमीवर शांततेत प्रचार सुरू

इम्फाळ,पुढारी वृत्तसेवा: मणिपुरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असले तरी निवडणुकीचे वातावरण मात्र तापलेले नाही. कोणत्याही पक्षाच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत की, रोड शो होत नाहीत. घरोघरी जाऊन भेटीगाठी आणि खासगी बैठकांच्या माध्यमातून तेथे प्रचार सुरू आहे. (Manipur Lok Sabha Election)

कुकी आणि मैतेई समाजांचे उमेदवारही एकमेकांच्या समाजाच्या वसाहतींमध्ये जाण्याचे टाळत आहेत. मैतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्यावरून भडकलेल्या मणिपुरात आतापर्यंत २१९ जण ठार झाले आहेत तर ५० हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यात संघर्षाच्या घटना आजही घडत आहेत. अशा स्थितीत लोकसभेची निवडणूक होत आहे. येथे दोन मतदारसंघांत निवडणूक होत असून त्यात संघर्षरत कुकी व मैतेई या दोन्ही समाजांचे उमेदवार आहेत; पण ते एकमेकांच्या वसाहतींमध्येही जाणे टाळत आहेत. (Manipur Lok Sabha Election)

हेही वाचा:

Back to top button