Lok sabha election 2024 : ‘… तर राहुल गांधींनी ‘ब्रेक’ घ्‍यावा’ : प्रशांत किशोरांचा सल्‍ला

प्रशांत किशाेर, राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)
प्रशांत किशाेर, राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी मागील दहा वर्षांपासून 'अयशस्वी'पणे काँग्रेस चालवत आहेत; परंतु ते बाजूला होऊन पक्षाची धुरा दुसऱ्या कोणाला देऊ द्यायला तयार नाहीत, असे स्‍पष्‍ट करत गेली दहा वर्षांपासून तुम्‍ही तेच काम करत असाल तर ब्रेक ( काही काळ विश्रांती ) घेण्यात काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी पाच वर्षांसाठी ब्रेक घ्‍यावा, असा सल्‍ला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे.

राहुल गांधींना वाटतं त्‍यांना सर्व काही माहित आहे….

'पीटीआय'शी बोलताना प्रशांत किशोर म्‍हणाले की, जगभरातील प्रभावी नेत्‍याचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते स्‍वत:मधील असणारी कमतरता मान्य करतात. तसेच एकदा कमतरता समजली की त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करणे; परंतू राहुल गांधी यांना वाटतं की त्‍यांना सर्व काही माहित आहे. तुम्‍ही मदतीची गरज मान्‍य केली नाही तर तुम्‍हाला कोणीही मदत करु शकणार नाही. त्‍यांना स्‍वत:ला योग्‍य वाटतो अशाच व्‍यक्‍ती हव्‍या असतात. मात्र हे व्‍यवहार्य नाही, असेही किशोर यांनी स्‍पष्‍ट केले.

राहुल गांधींनी पक्षाचे नेत्तृत्‍व अप्रत्‍यक्षपणे आपल्‍या हाती ठेवले

२०१९ च्‍या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला. त्‍यावेळी राहुल गांधी हे दुसर्‍या कोणाकडे तरी पक्षाचे नेतृत्त्‍व देतील, अशी चर्चाही काँग्रेस खासदारांमध्‍ये होती. मात्र त्‍यांनी नेमकी उलट कृती करत पक्षाचे नेतृत्त्‍व अप्रत्‍यक्षपणे आपल्‍याच हाती ठेवले. काँग्रेसचे अनेक नेते कबूल करतात की, त्‍यांच्‍या मंजुरीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक कोणत्याही व्यक्तीच्या पलीकडे जातात. वारंवार अपयशी होऊनही राहुल गांधी यांनी एकट्याने पक्षासाठी काही केले पाहिजे असा आग्रह धरू नये, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी पाच वर्षांसाठी ब्रेक घ्‍यावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

काँग्रेस पक्षाने आपली व्‍यवस्‍था परिपूर्ण करण्‍यासाठी प्रथम प्रयत्‍न करावेत

२०१४ लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सत्तेत होती. त्‍यावेळी २०६ वरुन काँग्रेस ४४ पर्यंत घसरली. त्‍या वेळी भाजपचा विविध संस्थांवर मर्यादित प्रभाव होता. भाजपच्‍या अनेक नेत्‍यांनी निवडणूक मोहिम यशस्‍वी करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र गेली दहा वर्ष काँग्रेस आपल्या व्‍यवस्‍था परिपूर्ण करण्‍यात झगडत आहे. त्‍यांनी सर्वप्रथम याकडे लक्ष देण्‍याची गरज असल्‍याचेही किशोर यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news