पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता आहे. देशाच्या ८० टक्के भागातून मान्सून गेला असून, आता फक्त दक्षिण भारतात आहे. असे असले तरीही उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने १४ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत उत्तर भारताला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. या दोन्ही स्थितीमुळे कोकणात १४ ते १६ व मध्य महाराष्ट्रात १५ व १६ रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा