Life Style : बद्धकोष्ठाच्या त्रासाने त्रस्त आहात? ‘हा’ घरगुती उपाय करून पाहा

Life Style : बद्धकोष्ठाच्या त्रासाने त्रस्त आहात? ‘हा’ घरगुती उपाय करून पाहा

पुढारी ऑनलाइन डेस्क : फास्ट फूड, जंक फूड हा आपल्या Life Style चा आता एक भाग बनला आहे. तसेच हायब्रीड पिकानंतर आता जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेले पीक येत आहेत. हे सर्व आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. परिणामी आज अनेकांना बद्धकोष्ठाचा त्रास जडला आहे. बद्धकोष्ठ हा त्रास असा आहे जो आपल्या दैनिंदिन कामकाजावर सरळ सरळ परिणाम करतो. तुम्हाला कुठेही वेळेत जायचे असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठाच्या त्रासापायी एक ते दोन तास आधी तयारी सुरू करावी लागते. तसेच कधीतरी ऑफिसमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर जायचे असेल तरीही अशा प्रसंगी बद्धकोष्ठतेमुळे समस्या उद्भवू शकतात.

Life Style बद्धकोष्ठावर आजवर अनेक प्रकारचे संशोधन आयुर्वेदापासून ते अॅलोपॅथीपर्यंत सर्वच पॅथींमध्ये देण्यात आले आहे. तरीही अनेकांना यावर योग्य ते उपचार साधता येत नाही. औषधांचा प्रभाव असेपर्यंत फक्त बद्धकोष्ठ थांबते. औषध बंद केले तरी पुन्हा पूर्वीसारखाच त्रास होतो. हे तुम्हालाही होते का? तुम्ही बद्धकोष्ठावर उपचार करून करून वैतागला आहात का? यावर सातत्याने पैसे खर्च करून तुम्हाला आर्थिक नुकसान होते का? बद्धकोष्ठतेमुळे तुम्ही मित्र-मैत्रिणींमध्ये चेष्टेचा विषय ठरत आहात का? तर मग आजीबाईच्या बटव्यातील हा उपाय तुम्हाला यातून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो.

तसे पाहता आजी-आत्या अशा ज्येष्ठ नागरिकांकडून आपण खूप काही शिकू शकतो. त्यांच्याकडे अनुभवांचा खजाना असतो. त्याचप्रमाणे पिढी दर पिढी चालत आलेल्या ज्ञानाचा वारसा असतो. आपल्याकडे आयुर्वेद तसेच प्रत्येक पिकणा-या धान्याच्या औषधी ज्ञानाचा फार मोठा ठेवा आहे. त्यातून आपण हे उपाय करू शकतो. असाच एक उपाय बद्धकोष्ठावर उपलब्ध आहे. तो म्हणजे 'बडीशेप'
Life Style बडीशेपची आणि आपली ओळख फक्त जेवण झाल्यानंतर मुखवास घेण्यापुरतीच. पण या पलीकडे हे छोटे-छोटे दाणे माणसाला निरोगी ठेवण्यासाठीचे मोठे-मोठे कार्य अगदी सहजपणे करतात. एखाद्या व्यक्तिला तोंडातून घाण वास येणे हा आजार असेल तर बडीशेप त्यावर फायदेशीर ठरते. तसेच बडीशेप हे बद्धकोष्ठतेवर एक अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे. डीशेपमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात. म्हणूनच पोटाशी संबंधित समस्यांवर बडीशेप रामबाण उपाय म्हणून काम करते.

बडीशेपमध्ये अँन्टी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते बद्धकोष्ठतेवर खूपच परिणामकारक ठरते. तसेच पचनाच्या समस्या देखिल बडीशेप खाल्ल्याने दूर होतात. त्यामुळेच जेवणानंतर मुखवास म्हणून बडीशेप खाण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. जेणेकरून जेवण व्यवस्थित पचावे हा त्या मागचा उद्देश. मात्र, आजच्या Life Style मुळे आपण या मुख्य ज्ञानापासून दूर जात आहोत.

Life Style बद्धकोष्ठ दूर होण्यासाठी असे करा बडीशेपचे सेवन

बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी बडीशेप पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या नंतर हे पाणी गाळून एका बाटलीत भरा. हे पाणी दिवसभर थोडे-थोडे करून प्या. तुम्हाला काही दिवसातच आराम पडेल. पण या पाण्याचा अतिरेक देखिल करू नका. तुमच्या पोटाचे निरीक्षण करा. तुम्हाला किती मर्यादेपर्यंत हे पाणी पुरेसे होते ते पाहा. कारण जेव्हा सातत्याने हे पाणी पिता तेव्हा पोटातील बद्धकोष्ठपणा कमी-कमी होत जातो. मात्र, नंतरही पाणी पिणे सुरू ठेवल्यास तुम्हाला लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून पाणी पित असताना कायम तुमच्या पोटाच्या सवयींवर लक्ष ठेवत चला. उदाहरणार्थ तुम्हाला कोणत्या वेळेला शौचास होते. एकावेळी गेल्यानंतर तुम्हाला किती वेळ शौचासाठी लागतो. दिवसातून किती वेळा शौचास होते. या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे बडीशेपचे पाणी पिणे कधी थांबवायचे याकडे लक्ष द्या.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news