Life Style : खाज सुटणे, जळजळणे, असे त्वचाविकार वारंवार होतात का? ‘हे’ कारण असू शकते | पुढारी

Life Style : खाज सुटणे, जळजळणे, असे त्वचाविकार वारंवार होतात का? 'हे' कारण असू शकते

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : तुमची त्वचा खूप संवेदनशील आहे का? त्वचेला उन्हात गेल्यानंतर लगेच दाह होणे, पार्लरमध्ये आय ब्रो करताना आजूबाजूची त्वचा खूपच लालसर पडणे, अशी लक्षणे असल्यास तुमची त्वचा खूपच संवेदनशील आहे. अशा संवेदनशील त्वचेसाठी तुम्हाला सातत्याने काळजी घ्यावी लागते. मात्र, कळत नकळत आजच्या Life Style मुळे अशा काही चुका घडतात की तुम्हाला वारंवार त्वचेला खाज सुटणे, त्वचेच्या एखाद्या भागावर जळजळणे, किंवा लाल पुटकूळ्या येणे वगैरे आजार तुम्हाला वारंवार जडतात का? तर मग त्यामागे ‘हे’ कारण असू शकते.

सध्या ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. तसेच कपडे आपल्याला फिट बसतात का नाही यासाठी आपण कायम कपडे ट्रायल करतो. हे आजच्या Life Style चे रुटिन झाले आहे. किंवा हल्ली कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा कपडे ट्रायल करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
ज्यावेळी तुम्ही कोणते कपडे ट्रायल करता. त्यावेळी हे लक्षात असू द्या की हे कपडे तुमच्या प्रमाणे आधी इतर अनेकांनी ट्रायल केले आहेत. त्यामुळे त्यांना जर काही त्वचा विकार असेल किंवा त्यांच्या अंगाला येणारा घाम हे याचा नकळतपणे त्या कपडावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे असे कपडे जर तुम्ही ट्रायल केले असतील तर तुम्हालाही त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये जाऊन आल्यानंतर तातडीने आंघोळ करून घ्या. म्हणजे तुमच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही.

विकत घेतलेले कोणतेही नवीन कपडे धुवून इस्त्रीकरून मगच वापरा

एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये शक्यतो नवीन कपडे घेतल्यानंतर न धुता तसेच घालण्याचा ट्रेंड दिसून आला आहे. मात्र, हे त्वचेसाठी आजाराचे निमंत्रण देणारे ठरू शकते. कारण पहिली गोष्ट मार्केटमधून जोपर्यंत तो कपडा तुमच्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत तो अनेक केमिकल प्रक्रियांमधून गेलेला असतो. नंबर दोन हे कपडे अनेकांनी ट्राय करून पाहिलेले असतात. त्यामुळे त्यांना काही विकार असतील आणि ते कपडे तुम्ही तसेच घातले तर तुम्हालाही तो आजार होऊ शकतो. विशेषकरून ऑनलाइन शॉपिंगमध्ये आठ दिवस रिटर्न पॉलिसी असते. त्यामुळे अनेक जण कपडे एकदा दोनदा वापरून नंदर रिटर्न करतात. परिणामी एखाद्यावेळी खराब झालेले कपडेसुद्धा पुन्हा केमिकल ड्रायक्लिनिंग करून पुन्हा विकण्यासाठी ठेवलेले असतात. त्यामुळे नवीन विकत घेतलेले कोणतेही कपडे पहिले स्वच्छ धुवून इस्त्री करून मगच वापरणे योग्य ठरेल. यामुळे तुमच्या त्वचेला विकार होण्याचा धोका टळतो.

कार्यक्रमांसाठी भाड्याने घेतलेले कपडे ड्रायक्लिनिंग करूनच वापरा

हल्ली प्रत्येक ठिकाणी गरबा, दांडियांचे कार्यक्रम सुरू असतात. मात्र, ब-याचवेळा यासाठी आपल्याकडे त्या कार्यक्रमानुसार अनारकली, शरारा, घागरा, चनिया चोली, असे कपडे नसतात. कारण असे कपडे अनेक वेळा आपण फक्त कार्यक्रमासाठीच वापरतो. मग एवढे महाग कपडे कायमस्वरुपी विकत घेण्यापेक्षा ते भाड्याने घेणे हा सोपा आणि कमी खर्चिक पर्याय आहे. ऑनलाइन शॉपिंग अॅप्समुळे हे ड्रेस भाड्याने देणे-घेणे खूप सोपे झाले आहे. परिणामी याकडे लोकांचा कल वाढत आहे. किंबहुना हे आपल्या Life Style चा भाग होत आहे. असे कपडे वापरताना देखिल खूप काळजी घेऊन वापरणे महत्वाचे असते. कारण तुमच्या आधी ज्यांनी हे कपडे वापरले आहे. त्यांनी ते कपडे ड्रायक्लिनिंग करून दिले असतील नसतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हे कपडे पुन्हा एकदा ड्रायक्लिनिंग करून वापरणे अधिक चांगले असते.

हे ही वाचा :

Life Style : प्रयत्न करूनही वजन वाढत नाही, मग ‘हा’ विनाखर्ची उपाय करून पाहा…

Life Style : …’हा’ सोपा उपाय करा आणि चेह-यावरील पिंपल्स, डाग पळवून लावा

Back to top button