Life Style : ‘या’ वेळी जेवा आणि वजन नियंत्रणात ठेवा

Life Style : ‘या’ वेळी जेवा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style वाढलेले वजन सर्वांचीच डोकेदुखी आहे. वजन कमी करण्यासाठी लोक सर्व प्रकारचे फंडे ट्राय करतात. पण तरीही परिस्थिती जैसे थे राहते. आपल्या या वजन वाढीचा फायदा कंपन्यांना त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी करून घेता. काहींना प्रोडक्टचा फायदा होतो काहींना होत नाही. फायदा झाला तरी प्रोडक्ट वापरणे बंद केले की पुन्हा पहिले पाढे 55 या म्हणीप्रमाणे पुन्हा वजन वाढते आणि तुम्ही हैराण होतात. तुमची पण परिस्थिती अशीच आहे का? तर मग हे आर्टिकल फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत संपूर्ण वाचा…

अनेक डायटिशिअन सल्ल्यानुसार डाएट करतात तर कोणी ऐकीव माहितीच्या आधारे आपले डाएट प्लानिंग करतात. जसे की, सकळचा नाश्ता/न्याहरी राजाप्रमाणे करावी, दुपारचे जेवण, मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे करावे आणि रात्रीचे जेवण भिका-याप्रमाणे करावे. अशी एक माहिती प्रचलित आहे. अनेक जण या आधारे आपले डाएट प्लान ठरवतात. पण तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिले का? की हे जेव्हा लिहिले गेले तेव्हा त्या काळातील लोकांची Life Style आणि आत्ताची तुमची Life Style यामध्ये आकाश-पाताळ इतका फरक आहे. मग या नियमाप्रमाणे जर तुम्ही तुमचे डाएट प्लान केले तर कसे चालेल?

याचप्रमाणे मध्यंतरी एक संतांनी सांगितलेला एक श्लोक चांगलाच फिरत होता. जो एकदा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी आणि वारंवार जेवतो तो रोगी आता अनेकांनी संतांची शिकवण म्हणून हे अमलात आणायचा प्रयत्न केला. मात्र, आजच्या Life Style ला हे सूट होते का? याचा विचार केला आहे का कधी? परिणामी असे प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणूनच कोणतेही उपाय करण्याआधी आपल्याला थोडे आपल्या शरीर शास्त्र आणि मना विषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.

काय सांगते आयुर्वेद शास्त्र, Life Style आयुर्वेद म्हणते किती वेळा जेवता किती जेवता काय जेवता याला महत्व नाही. कधी जेवता याला महत्व आहे. आपण जे काही जेवण केले आहे. त्याचे योग्य रितीने पाचन व्हायला हवे. मग दिवसातून 6 वेळा जेवा किंवा एकदा जेवा. जेवण व्यवस्थित पचायला हवे. मग आता प्रश्न पडतो की कधी जेवल्याने जेवण योग्य रितीने पचेल. आयुर्वेद म्हणते जेवण पचन्यासाठी तुमचा जठराग्नि व्यवस्थित पेटायला हवा. तरच जेवण व्यवस्थित पचते.

जठराग्नि शरीरात तेव्हाच पेटतो जेव्हा तुम्हाला कडक भूक लागलेली असते. कडक भूक लागल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड खाल्ले तरी ते व्यवस्थित पचते. कारण जठराग्नि पेटलेला असतो. तसेच जेवताना कधीही अन्नाला प्रणाम करून खाल्ल्यास त्यावेळी मन सात्विक झाल्याने सात्विक भोजन नसले तरी ते सात्विक बनते. म्हणून जेवताना हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला पोटात खूप भूक लागली असेल कडक भूक लागली असेल तेव्हाच जेवा म्हणजे जेवण योग्य रितीने पचेल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील. Life Style

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news