काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक

काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडीचे समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा प्रत्यय सध्या नाशिक शहरात बघावयास मिळत आहे. 'काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू' असे फलक शहरात सर्वत्र झळकत आहे. हे फलक सध्या नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिकमध्ये काँगेसने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फलकाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. 'जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष… भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू' अशी टॅगलाईन असलेले फलक महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन, व्दारका, सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, जुने नाशिक आदी ठिकाणी लावण्यात आले. या फलकाच्या माध्यमातून सध्याच्या महाराष्ट्राच्या उलथापालथीच्या राजकारणावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटण्याचे परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रसार केला जात आहे.

दरम्यान, भाजपने फोडाफोडीचे राजकारण अवंलबले आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. हे अनैतीक राजकारण मतदारांच्या पचनी पडलेले नाही. या परिस्थितीत केवळ काँग्रेसच मतदारांसाठी असल्याचा संदेश फलकाच्या माध्यमातून देत असल्याचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news