पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीत एकजूट किती आहे हे संध्याकाळी कळेल. महाविकास आघाडीत एकजूट आहे. महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष हातात हात घालून चालत आहेत, असा विश्वास राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. (विधान परिषद निवडणूक)
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज (दि.२०) रोजी मतदान सुरु आहे. यासंबंधित प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आजची निवडणूक महत्वाची आहे. महाविकास आघाडीत एकजूट आहे. एकजूट किती आहे हे आज संध्याकाळी कळेल. तिन्ही पक्षात सुसंवाद आहे. महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष हातात हात घालून चालत आहेत. तिन्ही पक्षाचे सर्व सतदार चांगल्या मंतानी निवडून येतील. हॉ़टेलवर असताना आमदारांवर दवाब येत होता. लोकशाहीला मालक निर्माण तयार झाले आहेत, असाही टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी : रामराजे नाईक-निंबाळकर,
एकनाथ खडसे
भाजप : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा
खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय.
हेही वाचलंत का?