कारखाना बंद राहावा म्हणून पाय आडवा घालण्याचे काम युवराज पाटील यांनी केले : भगीरथ भालके | पुढारी

कारखाना बंद राहावा म्हणून पाय आडवा घालण्याचे काम युवराज पाटील यांनी केले : भगीरथ भालके

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा कारखान्याचा चेअरमन म्हणून माझ्यावर केलेला एक जरी आरोप सिध्द झाला तर कारखाना निवडणुकीतून अर्ज माघारी घेतो, असे म्हणत भगीरथ भालके यांनी युवराज पाटील यांना आरोपी सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे. युवराज पाटील यांनीच विठ्ठल कारखाना सुरू होऊ नये, यासाठी सातत्याने पाय आडवा घालण्याचे काम केले असल्याचा आरोपही केला आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ रांजणी (ता. पंढरपूर) येथील शंभू महादेवाला नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी ‘सहकार शिरोमणी’चे अध्यक्ष कल्याण काळे, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, विठ्ठलाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, राजेंद्र शिंदे, नागेश फाटे, शहाजी साळुंखे यांच्यासह विठ्ठल आणि ‘सहकार शिरोमणी’चे आजी-माजी संचालक, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, भीमा परिवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. यावेळी भालके यांनी, मी चेअरमन झाल्यानंतर पाटील यांनी सतत आडवे येत ठरावावर सह्या न करता अडचणी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच, धाराशिव साखर कारखान्याने विठ्ठल सहकारी साखर कारखाना 25 वर्षार्ंच्या कराराने चालवण्यासाठी द्या, अशी मागणी कशासाठी केली, असा सवाल अभिजित पाटील यांना केला.

Back to top button