विधान परिषद निवडणूक : मतदान संपले, निकालाची धाकधूक

विधान परिषद निवडणूक : मतदान संपले, निकालाची धाकधूक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत (MLC Elections) अपेक्षेप्रमाणे २८५ आमदारांनी मतदान केले आहे. आता पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत दहावा उमेदवार कोणाचा निवडून येणार याची धाकधूक सुरू झाली आहे. विधानसभेच्या २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले असून मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाची संधी न्यायालयाने नाकारल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

(MLC Elections) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना दिले असून,  तिसऱ्या पसंतीची मते ही काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांना दिली आहेत. तर भाजपने आपल्या चार उमेदवारांना मतांचा सुरक्षित कोटा देताना दुसऱ्या पसंतीची सर्व मते प्रसाद लाड यांना दिल्याचे समजते. आता मतमोजणीत कोणाची रणनीती यशस्वी ठरते, याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news