Dravid Appreciation Karthik : द्रविड गुरुजींनी कौतुक केले कार्तिकचं, पण टेन्शन वाढलं ऋषभ पंतचं! | पुढारी

Dravid Appreciation Karthik : द्रविड गुरुजींनी कौतुक केले कार्तिकचं, पण टेन्शन वाढलं ऋषभ पंतचं!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजकोटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने खेळलेल्या जबरदस्त इनिंगवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकने राजकोटमध्ये त्याच्या शानदार खेळीने त्याची निवड का करण्यात आली हे दाखवून दिल्याची कौतुकास्पद टीप्पणी द्रविड गुरुजींनी केली आहे. (Dravid Appreciation Karthik he openly spoke about karthik’s role in t20 world cup 2022)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत कार्तिकने चार डावात 158.62 च्या स्ट्राइक रेटने 92 धावा केल्या. यादरम्यान त्याने राजकोटमध्ये 27 चेंडूत 55 धावांची मॅचविनिंग इनिंगही खेळली. आयपीएलप्रमाणेच त्या सामन्यातही त्याने धमाकेदार स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. कार्तिकच्या त्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. प्रशिक्षक द्रविडही दिनेश कार्तिकचे चाहते झाले. त्यांनी कार्तिकवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पण त्याच्या या कौतुकामुळे ऋषभ पंतच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा रंगली आहे. (Dravid Appreciation Karthik he openly spoke about karthik’s role in t20 world cup 2022)

पुढे जाण्याचे पर्याय खुले

आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर कार्तिकने जोरदार पुनरागमन केले. राजकोट येथील T20 सामन्यात एका क्षणी भारताने 81 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर कार्तिकने स्फोटक खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला, शिवाय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. एका मुलाखतीत मुख्य प्रशिक्षक द्रविड म्हणाले की, कार्तिक चमकदार कामगिरी करत आहे हे पाहून मी खूश आहे. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे 2022 च्या टी 20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत, मत त्यांनी व्यक्त केले. (Dravid Appreciation Karthik he openly spoke about karthik’s role in t20 world cup 2022)

कार्तिकबाबत द्रविड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पंतच्या अडचणी वाढल्या आहेत. पंत गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्यावर धावा करण्याचे दडपण निर्माण होत आहे. त्यातच या वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वच खेळाडू आपले जोरदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता पंतबाबत बीसीसीआयची निवड समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले.

पंतकडून पुन्हा पुन्हा त्याच चुका…

अनेक माजी खेळाडूंनी ऋषभ पंतच्या चुकांवर बोट ठेवले आहे. आपल्या चुकांमधून तो काही केल्या धडा घेत नसल्याचे दिसते. पंत घाबरून जातो आणि गोष्टी त्याच्या मनासारख्या होताना दिसत नाही हे पाहून लवकर आपली रणनिती बदलतो. आयपीएल 2022 मध्येही पंतची ही कमकुवत बाजू दिसून आली. तो लवकर रणनितीमध्ये बदल करतो. सामना जेव्हा संकटात सापडतो तेव्हा पंत घाबरून जातो, असे अनेकांचे म्हणणे आहे.

पंत चारही सामन्यांमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाला. पहिल्या तीन सामन्यात त्याने कव्हर्समध्ये झेल दिला, तर चौथ्या सामन्यात शॉर्ट थर्ड मॅनवर तो झेलबाद झाला. आयपीएल 2022 मध्येही तो अनेकदा खराब शॉट्स खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 सामन्यात 29, 5, 6 आणि 17 अशा धावा केल्या. त्याची निराशाजनक कामगिरी त्याला वर्ल्डकपच्या भारतीय संघातून बाहेर पडण्याचे कारण होईल असा अंदाज बांधला जात आहे.

दुसरीकडे दिनेश कार्तिक यष्टिरक्षक फलंदाज असून सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. संघ जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तो जबाबदारीने खेळ करत डाव साभाळतो आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. हे चित्र नुकत्याच झालेल्या आयपीएल आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत दिसले आहे. दरम्यान, कार्तिकला अगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या संघात स्थान मिळेल यात शंका नाही, अशी चर्चा सुरू झाले आहे.

Back to top button