Lagan Movie : उद्या चित्रपटगृहात रिलीज होणार ‘लगन’

lagan movie
lagan movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दांत व्यक्त करणं अवघडचं.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन (Lagan Movie ) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट येत्या उद्या शुक्रवार ६ मे ला चित्रपटगृहात रिलीज होतोय. लगन चित्रपटातून अज्या आणि नंदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे, अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. (Lagan Movie)

चित्रपटाला साजेशी दणक दणक, सरलं, पायी फुफाटी, दचकतंय ही चारही गाणी पाहायला मिळणार आहेत. 'सरलं सार अंधार सरलं पुनवेचा चांद उगल तुझ्याच येण्यान र'…. हे बहारदार प्रेमगीत, 'हलगीपुढं DJ नं नाद करायचा नाय'अशी गाणी वेड लावतील. 'पायी फुफाटा रुतला काटा' हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे. तसेच आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. संगीत पी. शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे आहे.

प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना 'प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं' हे सांगण्याचा प्रयत्न 'लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी' या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हा विचार घेऊन हा चित्रपट केल्याचे दिग्दर्शक अर्जुन गुजर सांगतात. ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास ही ते व्यक्त करतात.

'लगन'चे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते सय्यद मुस्तफा, भारत गुजर, रत्नमाला पवळ, मोहिनी गुजर, गहिनाथ गुजर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news