The Kapil Sharma Show : कृष्णा अभिषेकने वापसीसाठी घेतली तगडी रक्कम, एका एपिसोडला मिळणार इतके पैसे

कृष्णा अभिषेक
कृष्णा अभिषेक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडीयन अभिनेता कृष्णा अभिषेकने द कपिल शर्मा शोमध्ये वापसी केलीय. कृष्णा या शोमध्ये सपना ही भूमिका साकारतोय. या भूमिकेने कृष्णाला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. सीझनच्या सुरुवातीला तो या सोमद्ये दिसला नव्हता. आता त्याने पुन्हा दमदार एन्ट्री केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णाने शोमध्ये दमदार वापसी केलीय. तुम्हाला माहितीये का, तो एका एपिसोडसाठी किती रक्कम घेतो.

जेव्हा कपिल शर्मा शोचा प्रोमो आला. तेव्हा त्यामध्ये कृष्णाला पाहून फॅन्स आनंदीत झाले. सूत्रांनुसार, कृष्णा एका एपिसोडसाठी १०-१२ लाख रुपये मानधन घेतो. पण असंही म्हटलं जात आहे की, कृष्णा १० लाखांपेक्षा अधिक रक्कम घेऊ शकतो. परंतु, नेमकी किती रक्कम मिळणार आहे, त्याबद्दल खुलासा झालेला नाही.

कपिलच्या घरी रिहर्सलच्या आदल्या दिवळी कृष्णाचे स्वागत करण्यात आले. कृष्णा अभिषेक म्हणाला- कीकू (शारदा) ने मला पाहताच आलिंगन दिलं. कपिलदेखील खूप खुश होता. मी अर्चना पूरनसिंह यांच्याशी फोनवर बातचीत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news