Bread Matka Kulfi : ब्रेडपासून बनवा स्वीट ब्रेड मटका कुल्फी | पुढारी

Bread Matka Kulfi : ब्रेडपासून बनवा स्वीट ब्रेड मटका कुल्फी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हाच्या झळा लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान नागरिकांनी थंडगार शीतपेयाकडे आपला मोर्चा वळविला आहे. लिंबू सरबतासोबत कोल्डिंक्‍स, मसाले ताक, मट्टा हे पदार्थाचा आहारात वापर केला जातोय. दरम्यान घरच्या- घरी जर ब्रेडपासून स्वीट ब्रेड मटका कुल्फी बनवली तर. पाहुया रेसिपी… ( Bread Matka Kulfi )

साहित्य-

दूध- १ लिटर
ब्रेड- ४-५ स्पिस
साखर- ४ चमचा
बारीक केलेले बदाम- ८-१०
बारीक केलेले पिस्ता- ८-१०
केसर- थोडंस
वेलची पावडर- १ चमचा

कृती-

१ )   ब्रेडच्या साईडला असणाऱ्या केसरी रंगाच्या कडा काढून घ्याव्यात.

२ ) एका भांड्यात एक लिटर दूध उकळत ठेवावे.

३ ) दुधाला उकळी येईपर्यत ब्रेड मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.

४ ) मधूनमधून दूध हलवत रहावे. यानंतर दुधाला मलाई आणि निम्मे होईपर्यंत उकळू द्यावे.

५ ) दूध चांगले उकळल्यानंतर त्यात केसर घालून हलवावे.

६ )  यामध्‍ये पाच चमचे साखर आणि बारिक केलेला ब्रेड घालून हलवावे. दरम्यान ३ मिनिटे हे दूध आटवावे.

७ )  यात एक चमचा वेलची पावडर घालून चांगले हलवावे आणि गॅस बंद करावा.

८) मिश्रण घट्ट झाल्यावर ते थंड होण्यास खाली उतरावे आणि त्यात बारीक केलेले बदाम, पिस्ता घालावा.

९ ) मिश्रण थंड झाल्यावर छोटा असलेला मटका, कुल्फीचा साचा किंवा घरात असणारे छोटे ग्लासमध्ये हे मिश्रण भरावे आणि ८ ते १० तास फ्रिजमध्ये ठेवावे.

१० ) आईस्क्रिमसाठी वापरल्‍या जाणार्‍या कांड्या कुल्फीच्या मध्योमध लावाव्यात. ( Bread Matka Kulfi )

 

हेही वाचा : 

Back to top button