Salman Khan : सलमान म्हणतो, दुबई पूर्ण सुरक्षित, भारत मात्र... | पुढारी

Salman Khan : सलमान म्हणतो, दुबई पूर्ण सुरक्षित, भारत मात्र...

पुढारी ऑनलाईन डेस्क – सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याची वाय प्लस सुरक्षा करण्यात आली. आता एका मुलाखतीदरम्यान, त्याने आपल्या सुरक्षेबद्दल सांगितले. तो म्हणाला की, दुबई पूर्णपणे सुरक्षित आहे. (Salman Khan) भारतात मात्र ही समस्या येते. मुंबई पोलिसांनी सलमानची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सलमान जिथ जातो, तेथे त्याचे बॉडीगार्ड सोबत असतात. दुबईमध्ये आयोजित एका मुलाखतीत तो म्हणाला, धमक्यांची भीती नाही आणि तो युएईमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र भारतात ही समस्या आहे. ज्या कामासाठी तो गेला आहे, तिथे तो खूप जागृत आहे आणि सावध राहत आहे. (Salman Khan)

सलमान खान शो आप अदालतमध्ये वाढवलेल्या सुरक्षेबद्दल सांगितले की, मला सुरक्षा देण्यात आली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवत एकटे जाणे शक्य नाही. त्यापेक्षा मोठी गोष्ट ही असते, जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये असतो. इतकी सुरक्षा असते की, त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. लोक मला लो लूक देतात. माझे प्रेमळ फॅन्स, हा खूप गंभीर धोका आहे, यासाठी सुरक्षा वाढवण्यात आलीय.

एका मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता, सलमान खानबद्दल आमच्या समाजात राग आहे. त्याने माझ्या समाजाला अपमानित केलं आहे. त्याच्याविरोधात तक्रार केली होती. जर त्याने माफी मागितली नाही तर परिणाम भोगायला तयार राहा.

हे ही वाचा :

Back to top button