जयसिंगपूर पुढारी वृत्तसेवा : पुण्यात नोकरी करणारा २४ वर्षाचा एक इंजिनियर तरुण गावातील रखडलेल्या रस्त्यासाठी बेमुदत उपोषणाला बसला आहे. "जोपर्यंत रस्त्याचे काम चालू होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालूच राहील…!" असा त्यांनी निर्धार केला असून, आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
सविस्तर माहिती अशी की, इंजिनियर असलेला रोहन मगदूम मूळचा नांदणी गावचा. (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) तो पुण्यात नोकरी करतो. रस्ता मंजुर होवूनही गावातील रस्त्याची दुरावस्था पाहता त्याने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुट्टी घेतली. बुधवारपासून तो ग्रामस्थांबरोबर बेमुदत उपोषणाला बसला आहे. गावातील रस्त्याच्या काम सुरु होईपर्यंत उपोषण सुरुच राहिल, असा निर्धार त्याने केला आहे.
या पोस्टरवर लिहलं आहे की,"आमरण उपोषणामूळे जर काही माझ्या जीवास धोका उद्भवला, तर यास सर्वस्वी शासन जबरदार असेल".