Kiran Mane : विलास पाटीलनं माहौल झिंगाट केला, यावर्षी भावांनो…

किरण माने
किरण माने
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

मुलगी झाली हो साजिरी-शौनक आणि विलास पाटील यांच्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या आहेत. विलास पाटील म्हटलं की क्या बात है! विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या दमदार अभिनयातून या मालिकेत जीव आणलाय. प्रचंड मेहनतीनंतर किरण माने यांनी ही यशाला गवसणी घातलीय. दरम्यान, नव्या वर्षाच्या निमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीय. त्यांची ही पोस्ट व्हायरल होतेय. (Kiran Mane)

विलास यांनी चार फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यांनी यासोबत 'विलास पाटीलनं माहौल झिंगाट करून टाकला माझा यावर्षी भावांनो!' अशी कॅप्शन लिहिलीय.

किरण माने या पोस्टमध्ये म्हणतात-

…भयान श्ट्रगल करतोय गेली कित्येक वर्ष…नाटकं लै भन्नाट मिळाली आविष्यात.. त्यात रोलबी जबराट मिळाले.. पन तरीबी सिनेमा-टीव्हीत म्हनावं असं काम मिळत नव्हतं. 'माझ्या नवर्‍याची बायको' मधल्या नागपूरी शिरीषदादानं बर्‍यापैकी ओळख दिलीवती चेहर्‍याला.. पन त्यात वाव नव्हता फारसा. अशात 'स्टार प्रवाह' चॅनलवर 'मुलगी झाली हो' मालिका सूरू झाली.. त्यात विलास पाटील नांवाची एक खलनायकी भुमिका मिळाली.. म्हन्लं चला, करूया हे बी !

…हळूहळू ही भुमिका लै खतरनाक वळनं घ्यायला लागली. क्रूर, निर्दयी विलासच्या काळजाला पाझर फुटायला लागला.. त्याच्यात लपलेला हळवा बाप बाहेर डोकवायला लागला.. बाप-मुलगा-नवरा-सासरा-मित्र-व्याही अशा अनेक पातळ्यांवर विलास रसरसून-समरसून जगायला लागला.

एक अभिनेता म्हनून लै लै लै मज्जा आली… मी मूळचा प्रायोगिक नाटकातला. त्यामुळं अभिनय ही गोष्ट हलक्यात घेनं जमत नाय मला. विलासच्या कॉम्प्लीकेटेड 'भिरकीट' स्वभावातले बारकावे समजून घेऊन साकारनं हे मी एक चॅलेंज म्हनून घेतलं ! मिळालेला प्रत्येक सिन – प्रत्येक शॉट मी मनापास्नं, जीव तोडून केला.. प्रत्येक वाक्याला न्याय देन्याचा पुरेपुर प्रयत्न केला. रोहीणी निनांवेंचा तगडा स्क्रीनप्ले आणि मिथिला सुभाष यांचे दणकेबाज संवाद यांमुळे ही भुमिका आनखीनच सजली, खुलली, रंगली !! या तगड्या सातारी रांगड्या मानसाची भुमिका प्रेक्षकांनीही लै लै लै डोक्यावर घेतली !!! 'नाटका-सिनेमासारख्या बहुआयामी, तगड्या व्यक्तीरेखा मालिकेत नसतात.' या माझ्या समजाला या भुमिकेनं खोटं ठरवलं…

..सध्या 'स्टार प्रवाह' चॅनल लोकप्रियतेच्या शिखरावर हाय. यामुळं संपूर्न मराठी मुलखात माझं काम पोचलं ! जगभरातनं मराठी मानसांच्या नादखुळा प्रतिक्रिया येतात.. विलासच्या व्यक्तीरेखेवर अनेक मिम्स बनायला लागले. स्टार प्रवाहच्या अनेक इव्हेन्टस् मध्ये विलास पाटील ही व्यक्तीरेखा घेऊन स्कीटस् सादर केली गेली. लै भारी वाटतं. संघर्षाला फळं यायला लागल्यागत वाटतं.

..याचबरोबर माझा पहीला म्यूझिक व्हिडीओ आला. 'माझ्या विठ्ठला' ! आदर्श शिंदे यांनी गायलेल्या, संकेत शिर्के या माझ्या मित्रानं कंपोज केलेल्या आनि निलेश धुमाळनं गीतलेखन-निर्मिती केलेल्या या गान्याला युट्यूबवर 1.5 मिलीयनपेक्षा जास्त व्हियूज मिळाले. नुकतंच या गान्याचं 'व्हिंटेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'म्युझीक व्हिडीओ' सेक्शनमध्ये ऑफिशियल सिलेक्शन झालंय !
…एकंदरीत हे वर्ष लै म्हंजी लैच नादखुळा गेलेलं हाय. लब्यू 2021 ❤️

या पोस्टनंतर मानेंच्या फॅननी कमेंटचा भरभरून वर्षाव केलाय. फॅन्सनी सोशल मीडियावर काय म्हटलंय पाहा –

खरं तर काका तुम्ही ना लई भारी आहात…मलाही तुमच्या बद्दल खूप माहीत नव्हतं पण मालिके मूळ मला तुमच्या बद्दल समजलं.. तसं मी net वर शोधायला सुरुवात केली…मग काय तुमची तर लई मोठ्ठी फॅन झाले?तुम्ही लई आवडता मला❤️ तुमचं लाईव्ह नाटक बघायची लई लई इच्छा आहे माझी?तुमचा music video पण पहिला आहे मी…तो नादखुळाच आहे?तुमच्या acting ला तोड नाय काका?love you till moon and back❤️❤️❤️

दुसऱ्या फॅनने लिहिलंय-सर तुम्ही नेहेमिच खूप छान लिहिता… अभिनया सारखिच तुमच्या लिखान शैलीला तोड़च नाही.. खर तर तुमच्या याच लिखनामुले आम्ही तुमच्याकडे खेचले जातो.. कि सरांची नवीन पोस्ट केव्हा येते….. एकदम सातारी तडका असतो तुमच्या बोलन्यामधे… A Big Fan of Yours… Wish you Good Health ahead… All the very best for your upcoming Success ❤️ We SATARKARS are Really Very Proud On You ?? Keep Going Ahead… We all are with you always ✌️?

तिसऱ्या फॅनने लिहिलंय- @kiranmane7777 सर, तुम्ही विलास पाटील अक्षरशः जगलात… तुमचा स्वाभिमानी स्वभाव, सत्याची बाजू असणारा आणि कोणालाही ना घाबरणारा.. पाटिलवाड्यातील बायकांचा मान राखणारा आणि त्यांच्या कडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याची मान मोडून टाकणारा… असा रांगडा पण एकदम निर्मळ आणि प्रेमळ विलास पाटील… सुरुवातीला मला तुमचा खूप राग यायचा जेंव्हा तुम्ही माऊ वरती रागवायचा… पण नंतर तुमच्यातला मायाळू बाप बघितल्यावर लई भारी वाटले… खूप शुभेच्छा नवीन वर्षासाठी.

आणखी एका फॅनने लिहिलंय-Patil patil ❤️ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तुम्ही ❤️ माझे आई वडील तुमची मालिका नेहमी बगत आसतात ?पण बाहेर जावे लागते शिक्षणासाठी ❤️पण जेव्हा केव्हा घरी येतो तेव्हा मात्र तुमची आठवण नक्की काढत आसतात ❤️ जर कधी live la join केले तर लय लय भारी वाट्टेल आम्हाला ….

Vilas Patil jinkal tumhi, best wishes for new year?, तुम्हाला सोनेरी पडद्यावर मुख्य भुमिकेत बघण्याची आमची इच्छा नवीन वर्षात पुरी होवो हि सदिच्छा ?, एकदम झाक विलास काका नाद खुळ परफोमेंस ??, Tumchaya pahilaya festival madhe pun bugitla hota naad khuda dance kartat tumhi. मला तुमचा अभिनय माझ्या नवऱ्याची बायको पासून खूप आवडतो आणि आता मुलगी झाले हो मध्ये पण तुमची अक्टिंग पण अप्रतिम ???, एक नादखुळा अष्टपैलू कलाकार आहात तुम्ही सर, सुपर हिरो एक नबंर बछड्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news