King Charles Coronation : किंग चार्ल्स III यांचा आज राज्याभिषेक सोहळा

King Charles Coronation : किंग चार्ल्स III यांचा आज राज्याभिषेक सोहळा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनमधील सात दशकांतील सर्वात मोठ्या समारंभात चार्ल्स तृतीय यांचा आज शनिवारी ब्रिटनचे राजा म्हणून राज्याभिषेक सोहळा होणार आहे. किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी एकूण २०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राजा चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ब्रिटनला तब्बल ७० वर्षांनी नवा राजा मिळणार आहे. (King Charles Coronation)

सर्वात वयस्कर ब्रिटिश सम्राट

सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांची आई राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाल्यावर चार्ल्स तृतीय हे त्यांच्यानंतर गादीवर आले. किंग चार्ल्स तृतीय हे सप्टेंबरमध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे १४ व्या शतकातील सिंहासनावर विराजमान झाले. आणि ते ३६० वर्षांचा सेंट एडवर्डचा मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवले जाणारे ते सर्वात वयस्कर ब्रिटिश सम्राट बनतील. नव्या राजाच्या या राज्याभिषेकासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सहभागी होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुणे येत आहेत. राज्याभिषेकावर सुमारे एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. किंग चार्ल्स III च्या कपड्यांपासून ते सोनेरी गाडीपर्यंत आणि राज्याभिषेकाच्या सिंहासनापासून राजाच्या मुकुटापर्यंत खास असं वैशिष्ट्य आहे.

भारताचे उपराष्ट्रपतीही उपस्थित

स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता शाही सोहळा सुरू होईल. गेल्या ९०० वर्षांपासून सुरू असलेल्या ब्रिटनच्या जुन्या परंपरेनुसार हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. किंग चार्ल्स तृतीय हे ब्रिटनच्या इतिहासातील ४० वे सम्राट बनतील. भारतातून किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकात सहभागी होण्यासाठी उपराष्ट्रपती धनखड ब्रिटनला पोहोचले आहेत. सध्या ब्रिटन ही भारतानंतर जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथील पंतप्रधान देखील भारतीय वंशाचे ऋषी सुनक आहेत.

ब्रिटिश इतिहासातील राज्याभिषेक परंपरा

ब्रिटनच्या इतिहासात राज्याभिषेकाची परंपरा गेल्या ९०० वर्षांपासून सुरू आहे. २ जून १९५३ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे येथे राणी एलिझाबेथ II च्या राज्याभिषेक झाला. त्यावेळी राजा चार्ल्स अवघ्या ४ वर्षांचे होते. एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकाला ८००० पाहुणे आले होते. याशिवाय लाखो लोकांनी हा कार्यक्रम टीव्हीच्या माध्यमातून पाहिला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news