किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त ठरला

पुढारी ऑनलाइन डेस्क : ब्रिटनचे नवे सम्राट किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची तारीख ठरली असून बंकिंगहम पॅलेसने मंगळवारी जाहीर केली. बंकिंगहम पॅलेसने घोषणा केली की किंग चार्ल्स III यांचा राज्याभिषेक सोहळा 6 मे 2023 रोजी वेस्टमिनस्टर अॅबे, लंडन येथे होणार आहे. वेस्टमिनिस्टर अॅबे इथे ब्रिटिश राजांच्या राज्याभिषेकाची परंपरा गेल्या 900 वर्षांपासून आहे.
किंग चार्ल्स् III यांच्या राज्याभिषेक 2 जून ला होईल, जागतिक पातळीवर अशी सर्वांचीच अपेक्षा होती. कारण 2 जून 1953 ला महाराणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच तारखेला राज्याभिषेक होईल असे सर्वांना अपेक्षित होते.
ब्रिटनच्या राजघराण्याची ही एक हजार वर्षांची परंपरा आहे. त्याचे पालन करून कँटरबरीच्या आर्चबिशपद्वारे ही सेवा आयोजित केली जाईल. राज्याभिषेक सोहळा हा किंग चार्ल्स तृतीय यांच्या समवेत पत्नी राणी कॅमिला यांच्यासमवेत होईल, अशी पुष्टी बंकिंगहम राजवाड्याकडून करण्यात आली आहे.
बकिंघम पॅलेसने सांगितले की, “राज्याभिषेक आजच्या राजाच्या भूमिकेचे प्रतिबिंबित करेल आणि भविष्याकडे पाहील, तर दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरा आणि उत्सवात रुजलेला असेल,” बकिंगहॅम पॅलेसने सांगितले.
हे ही वाचा :
किंग चार्ल्स ब्रिटनचे नवे सम्राट
ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून ‘राजा चार्ल्स III’ यांची आज ताजपोशी