‘राजा चार्ल्स III’ यांची ब्रिटनचे महाराज म्हणून अधिकृत घोषणा

‘राजा चार्ल्स III’ यांची ब्रिटनचे महाराज म्हणून अधिकृत घोषणा

पुढारी ऑनलाइन डेस्क : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजा चार्ल्स-III (तिसरे) यांची आज अधिकृतपणे ब्रिटनचे महाराज म्हणून घोषणा करण्यात आली. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सेंट जेम्स पॅलेस येथे झालेल्या अॅक्सेसेशन कौन्सिलच्या बैठकीत किंग चार्ल्स यांची अधिकृतपणे ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषणा करण्यात आली.

ब्रिटनच्या लंडनमधील सेंट जेम्स पॅलेस येथे अॅक्सेसन कौन्सिलमध्ये ब्रिटनच्या नवीन महाराजांची सम्राटाची घोषणा करण्यात आली. यावेळी क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला, प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम, पंतप्रधान लिझ ट्रस आणि इतर उपस्थित होते. तत्पूर्वी, ब्रिटनचे नवीन सम्राट म्हणून महाराजा चार्ल्स तिसरे शुक्रवारी प्रथमच बकिंगहॅम पॅलेसमध्ये दाखल झाले होते.

प्रिन्स चार्ल्स पत्नी कॅमिलासह लंडनला परतले आहेत, जिथे त्यांनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेतली. त्याचवेळी, प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या जनतेला प्रथमच महाराज या नात्याने संबोधित केले. आपल्या भाषणात राजा चार्ल्स यांनी आपल्या आई एलिझाबेथचे आभार मानून आयुष्यभर सेवेची शपथ घेतली. याशिवाय त्यांनी बकिंगहम पॅलेसच्या बाहेर उपस्थित लोकांचीही भेट घेतली. त्यांच्या शोकसंवेदना घेत त्यांनी आपली आई क्वीन एलिझाबेथ यांच्याप्रमाणे आपणही आपले काम करू असे आश्वासन दिले.

स्कॉटलंडच्या निवासस्थानी होलीरूडमध्ये राणीची शवपेटी

राणी एलिझाबेथसाठी कॅथेड्रलमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. ऑपरेशन युनिकॉर्न अंतर्गत, राणींची शवपेटी स्कॉटलंडच्या निवासस्थानी होलीरूड येथे राहील. मिळालेल्या माहितीनुसार, ती 13 सप्टेंबरला लंडनला आणली जाणार आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news