Priyanka Mallick : राज्याभिषेक कार्यक्रमासाठी कॅमिला यांचा ड्रेस डिझाइन केला भारतीय डिझायनरने!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा (King Charles-III) यांच्या शाही राज्याभिषेकासाठी जय्यत तयारी सुरु आहे. हा सोहळा शनिवारी, ६ मे लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे येथे संपन्न होणार आहे. या राजेशाही सोहळ्याला लाखो लोक सहभागी होणार आहेत. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भावी राणी कॅमिला यांच्यासाठी ड्रेस बनवण्यात आला आहे. हा ड्रेस भारतीय डिझायनरने बनवला आहे. तिचं नाव आहे प्रियांका मल्लिक. (Priyanka Mallick) प्रियांकाने बनवलेला ड्रेस राणी कॅमिला यांना आवडला आहे. त्याबदद्ल त्यांनी प्रियांकाचे राणीने आभार मानले आहे.
Priyanka Mallick : अत्यंत प्रतिभावान कलाकार
किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी कॅमिलाच्या पोशाखांपैकी एक ड्रेस पश्चिम बंगालमधील डिझायनर प्रियांका मल्लिकने यांनी डिझाइन केला आहे. कोलकाताजवळील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील रहिवासी असलेल्या प्रियांका यांचे आभार मानणारे पत्र कॅमिला यांनी पाठवले आहे. हा ड्रेस राणी ६ मे रोजी होणाऱ्या संध्याकाळच्या पार्टीत परिधान करणार आहे. कॅमिला यांनी त्यांच्या पत्रात प्रियांकाला ड्रेस डिझाइन केल्याबद्दल ‘अत्यंत प्रतिभावान कलाकार’ म्हणून उल्लेख केला आहे. पत्रात पुढे असे लिहिले आहे की, “ सुंदर ड्रेस डिझाइन पाठवल्याबद्दल तुमचे मी क्वीन कॉन्सोर्टच्या वतीने आभार मानू इच्छितो. आम्हाला वेळ दिल्याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत. तुम्ही खूप प्रतिभावान कलाकार आहात.
गेल्या सहा महिन्यांपासून काम
याबाबत बाेलताना प्रियांका म्हणाली, “मी नवीन राणीचा ड्रेस डिझाइन केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राजघराण्याशी यासंदर्भात संवाद सुरू आहे. माझ्या डिझाइन्ससाठी मला राणीकडून कौतुकाचे पत्र मिळाले. त्यानंतर, मी राजासाठीही ब्रोचही डिझाइन केले.”
हेही वाचा :