KGF star Yashची लव्हस्टोरी खास, राधिका खूपचं सुंदर!

kgf star yash and his wife radhika pandit
kgf star yash and his wife radhika pandit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

साउथ सुपरस्टार यश (KGF star Yash ) हा भारतातील एक उत्तम अभिनेत्यापैकी एक आहे. साऊथमध्ये यशचे चांगला फॅन फॉलोईंग आहे. यशची (KGF star Yash ) इतकी लोकप्रियता आहे की, त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो तरुणी वेड्या झाल्या आहेत. इतकी लोकप्रियता, स्टारडम मिळवलेल्या यशने राधिका पंडितला डेट करणं सुरू केलं होतं. ही राधिका पंडित नंतर त्याची जोडीदार झाली. राधिका पंडित दिसायला इतकी सुंदर आहे की, तिच्यावरून तुमची नजर हटणार नाही. नुकताच यश आणि तिने व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय. त्याचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, राधिका पंडित कोण आहे?

yash and radhika
yash and radhika
yash and radhika
yash and radhika

जर यशचं (KGF star Yash) इस्टाग्राम पाहिलं तर तो फारसा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही. चित्रपटांशिवाय त्याचे अधिकतर पोस्ट पत्नी आणि मुलांसोबतचे आहेत. आतादेखील यशने व्हॅलेंटाईन डे खास अंदाजात साजरा केला. यशची पत्नी राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाईन्स डेचे खूप छान फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये यश-राधिका डिनर डेटवर दिसत आहेत.

yash and radhika
yash and radhika
yash and radhika
yash and radhika

राधिकाने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये यश आपल्या पत्नीसोबत दिसत आहे. मागे खूप सुंदर डेकोरेशन दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये डिनर लोकेशन दिसत आहे. फोटो शेअर करत राधिकाने लिहिलं, Always.. "Better Together" ❤ Happy Valentine's everyone!

कोण आहे यश?

यशचं खरं नाव 'नवीन कुमार गोडा' आहे. कन्नड चित्रपटातील नवीन एक मोठा सुपरस्टार आहे आणि यश नावाने तो ओळखला जातो. यशची भेट राधिकाशी एका शूटवेळी झाली होती. दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या परीच्या कहाणीपेक्षा वेगळी नाही.

यश- राधिकाची पहिली भेट

राधिका त्यावळी टीव्ही मालिका 'नंदा गोकुळ'मध्ये काम करत होती. त्यावेळी यशला रिप्लेस करण्यात आलं होतं. २००८ मध्ये दोघांनी 'Moggina Manasu' चित्रपटातून डेब्यू केला. २०१२ मध्ये चित्रपट 'Drama' मध्ये जेव्हा यशला साईन करम्यात आले, तेव्हा नियतीने पुन्हा एकदा खेळ खेळला.

yash and radhika
yash and radhika

यावेळी चित्रपटाच्या हिरोईन राधिकाने रिप्लेस केलं होतं. दोघांचा एकत्र पहिला चित्रपट होता. एकत्र काम करण्याच्या दरम्यान दोघांच्यात मैत्री झाली. ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. राधिकालाही तो आवडत होता. परमेश्वरानेच तिच्यासाठी यशला निवडलं आहे, असं तिला वाटायचं.

yash and radhika
yash and radhika

रोमॅंटिक अंदाजात केलं प्रपोज

यशने खूप रोमँटिक अंदाजात राधिकाला प्रपोज केलं होतं. त्यांची ही कहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नाही. यश हा राधिकाला नेहमी हिंट द्यायचा की, त्याच्या जीवनात कुणीतरी आहे आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण, राधिकाला ही गोष्ट माहिती नव्हती. ती नेमही यशला टिप्स द्यायची की, त्या स्पेशल मुलीला कशाप्रकारे आपल्या मनातील भावना सांगायच्या? अखेर, व्हॅलेंटाईन-डेच्या औचित्याने यशने ठरवं की, आता राधिकाला प्रपोज करायचंच!

yash and radhika
yash and radhika

व्हॅलेंटाईन-डेला यशने राधिकाला कॉल केला आणि तिचा प्लँन विचारला. राधिका म्हणाली की, ती चित्रपट पाहायला जातेय. त्यावेळी यशला राधिकासमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. पण, तो घाबरायचा. दोघांची मैत्री खराब होऊ नये म्हणून त्याची आपल्या भावना व्यक्त करायची हिंमतचं झाली नाही. यशलाही माहिती नव्हतं की, राधिका त्याच्याविषयी काय विार करते? मग यश च्या मॉलमध्ये गेला, जेथे राधिका आपल्या पालकांसोबत चित्रपट पाहायला गेली होती. यशने मॉलमधून राधिकाला आवडणाऱ्या वस्तू खरेदी केल्या.

yash and radhika
yash and radhika

यशने राधिकासाठी गिफ्ट घेतले. पण, तिला देण्याऐवजी त्याने तिच्या गाडीत गिफ्ट ठेवले. राधिका जेव्हा आपल्या गाडीमध्ये गेली तेव्हा गिफ्टसोबत एक कार्डदेखील मिळालं. यावर लिहिलं होतं-"हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!'

राधिकाने ओळखले की, गिफ्ट्स – कार्ड तिला कुणी दिले. पण, याविषयी दोघांनी कधीचं एकमेकांशी बोलणं केलं नाही. नंतर एक दिवस खूप धाडसाने यशने फोनवरून प्रपोज केलं. पण, राधिकाने प्रपोजलचं उत्तर देण्यासाठी ६ महिने लावले.

yash and radhika
yash and radhika

लग्न आणि ग्रँड रिसेप्शन

१२ ऑगस्ट, २०१६ रोजी दोघांचा साखरपुडा गोव्यात झाला होता. ९ डिसेंबर २०१६ रोजी बंगलोरमध्ये दोघांनी लग्न केलं. 'बंगलोर पॅलेस'मध्ये एक ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिलं होतं. २ डिसेंबर, २०१८ मध्ये दोघांना आयरा ही मुलगी झाली. त्यांना दुसरा मुलगा यथर्वही आहे.

yash and radhika
yash and radhika

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news