टाटा ग्रुपच्या ‘या’ २ शेअर्समुळे राकेश झुनझुनवाला मालामाल! १० मिनिटांत १८६ कोटींची कमाई 

टाटा ग्रुपच्या ‘या’ २ शेअर्समुळे राकेश झुनझुनवाला मालामाल! १० मिनिटांत १८६ कोटींची कमाई 

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारामध्ये लगोपाठ दोन ट्रेडिंगमध्ये घसरण झाल्यानंतर मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये उघडला होता. भारतीय शेअर बाजारातील सकारात्मक सुरूवातीमुळे बिगबुल असणारे राकेश झुनझुनवाला यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या एकूण संपत्तीत बाजार उघडल्यानंतर केवळ १० मिनिटांत तब्बल १८६ कोटी रुपयांची भर पडली. याचं कारण टाटा ग्रुपच्या स्टाॅक्स-टाइटन आणि टाटा मोटार्स आहे. हे दोन्हीही स्टाॅक राकेश झुनझुनवालाच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत.

टायटनच्या शेअरची किंमत सोमवारी एनएसईवर २३९८ रुपयांवर बंद झाली. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता २३.९५ रुपये प्रति शेअर अपसाईड गॅपने उघडी झाली आणि त्यानंतर केवळ १० मिनिटांत म्हणजेच ९.२५ वाजता त्याची किंमत २४३५ रुपयांपर्यंत वर चढत गेली. शेअर बाजार उघडताच १० मिनिटांत प्रति शेअरची किंमत ३७ रुपयांपर्यंत गेली.

अशाप्रकारे राकेश झुनझुनवाला होल्डिंग कंपनीचे शेअर टाटा मोटर्स शेअरबरोबर वाढत गेले. टाटा मोटर्स शेअरची किंमत ४.७० प्रति शेअरच्या अपसाईड गॅपबरोबर ४७६.१५ रुपयांवर खुली झाली आणि सकाळी ९.२५ वाजेपर्यंत ४७६.२५ पर्यंत वाढत गेली. सोमवारी ऑटो स्टाॅक एनएसईवर ४७१.४५ प्रति शेअरवर बंद झाला होता.

'टाटा'मध्ये राकेश झुनझुनवालांची भागीदारी किती?

टायटन कंपनीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत शेअरधारक पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला आणि त्याची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांची भागीदारी आहे. राकेश झनझुनवाला यांच्याकडे ३ कोटी ५७ लाख १० हजार ३९५ शेअरमध्ये ४.०२ टक्के भागीदारी आहे. त्याचबरोबर पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ९५ लाख ४० हजार ५७५ शेअर्समध्ये १.०७ टक्के भागीदारी आहे. याचाच अर्थ झुनझुनवाला दाम्पत्याकडे कंपनीचे ४ कोटी ५२ लाख ५० हजार ९७० शेअर्स आहे म्हणजेच ५.०९ टक्के भागीदारी आहे. एकूण झुनझुनवाला यांच्याकडे ३ कोटी ९२ लाख ५० हजार टाटा मोटार्सच्या शेअर्सचे १.१८ टक्के भागीदारी आहे.

राकेश झुनझुनवालाच्या एकूण संपत्तीतील वाढ

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत बाजार उघडल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत ३७ टक्के प्रति शेअरने वाढली. या वृद्धीबरोबर राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे १६७ करोड (३८ x ४,५२, ५०, ९७०) वाढ झाली, तर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये बाजार उघडल्यानंतर १० मिनिटांत ४.८० प्रति शेअरने वाढली, त्यामुळे झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत सुमारे १९ करोड रुपयांची वाढ झाली आहे. एकंदरीत झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत अवघ्या १० मिनिटांत १८६ कोटी रुपायंची वाढ झाली आहे.

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news