आसारामबापूचे समर्थक म्हणताहेत, ‘जस्टिस फाॅर बापूजी’ | पुढारी

आसारामबापूचे समर्थक म्हणताहेत, 'जस्टिस फाॅर बापूजी'

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी २०१३ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापूला न्याय मिळावा, यासाठी त्याच्या नेटकरी समर्थकांनी सोशल मीडियावरून ‘जस्टिस फाॅर बापूजी’, ‘बिनो संतो के कैसा हिन्दू राष्ट्र’, नावाचे ट्रेंड सुरू केले आहेत. त्यामध्ये हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई आघाडीवर असून, त्यांनी आसारामबापूच्या समर्थनार्थ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

धनंजय देसाई एक व्हिडिओमध्ये सांगत आहे की, “महान संतांच्या चारित्र्यावर आरोप करण्यात आले होते. अशाच आरोपांना आसारामबापू बळी पडलेले आहेत. त्यामुळे बापू संकटमध्ये नाहीत तर देश संकटामध्ये आहे. भारतीय जनतेची जबाबदारी आहे की, आपल्या भारतीत्वला शुद्ध करण्यासाठी, चारित्र्याला मजबूत करण्यासाठी असे लाच्छनास्पद आरोपांना धुडकावून लावायला हवे”, अशा शब्दांत त्‍यांनी आसारामबापूचे समर्थन केले आहे.

“तुमच्या पुरुषार्थ जागा करून सभा, साधना, आंदोलन करून किंवा आपापल्या भागातील आमदार-खासदारांच्यावर दबाव वाढवा. जर तुमचा नेता तुमचं ऐकत नसेल तर त्याला मत देऊ नका. त्याचं नुकसान करा. त्याच्या घरात घुसा आणि सांगा की, जर आसारामबापू जेलमधून बाहेर येणार नसतील, तुम्ही संसदेत जाऊ शकणार नाही”, असंही धनंजय देसाई यांनी म्‍हटलं आहे.

ते पुढे म्हणतात की, “जो ज्या भाषेत समजतो, त्या भाषेत त्याला उत्तर दिलं पाहिजे. आपण हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी पुढे पाऊल टाकत आहोत, तर आसारामबापूंच्याशिवाय हिंदू राष्ट्र शक्य नाही. संताशिवाय हिंदू राष्ट्र होऊच शकत नाही. तुम्हाला संतापासून तोडले जात आहे. त्यामुळे तुम्हाला आवाहन करतो की, आसारामबापूंना सोडविण्यासाठी मदत करा. आसारामबापू जय…”, असंही धनंजय देसाई यांनी व्हिडिओमधून सांगितलं आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button