गोवा विज्ञान उत्सव : ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ प्रसार उत्सव 22 पासून ; विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन | पुढारी

गोवा विज्ञान उत्सव : ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ प्रसार उत्सव 22 पासून ; विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विज्ञान प्रसार, भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, प्राचार्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय व गोवा विद्यापीठ (गोवा विज्ञान उत्सव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ विज्ञान प्रसार उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणार्‍या या उत्सवानिमित्त 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान विज्ञान विषयावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Russia Ukraine crisis : युक्रेन सीमेवर रशियाकडून आणखी ७ हजार सैन्य तुकड्या तैनात, अमेरिकेचा दावा

विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी संवाद, त्याचा प्रसार या उद्देशाने (गोवा विज्ञान उत्सव) हा उत्सव भरविण्यात येणार आहे.छायाचित्रण व माहितीपट स्पर्धा ही महाविद्यालयीन व सामान्य नागरिकांसाठी स्पर्धा आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी छायाचित्र व माहितीपट 23 फेब्रुवारी रोजी जमा करावयाचे आहेत. एकपात्री अभिनय, भित्तीचित्र व निबंध स्पर्धा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांसाठीही आपले एकपात्री अभिनयाची चित्रफित, भित्तीचित्र व निबंध 23 फेब्रुवारी रोजी जमा करावयाचे आहेत.

चित्रकला व विज्ञान प्रतिकृती स्पर्धा शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व सामान्य नागरिक (गोवा विज्ञान उत्सव) यांच्यासाठी आहेत. चित्रकला स्पर्धेची नोंदणी 23 तारखेला करावयाची आहे. व चित्र 26 तारखेला जमा करावयाचे आहे.
विज्ञान प्रतिकृती 23 तारखेला जमा करावयाची आहे.

पुणे : इंदापूर तालुक्यात गट-गणांच्या फेररचनेविषयी उत्सुकता

कविता व रांगोळी स्पर्धा या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ व सामान्य नागरिक यांच्यासाठी आहेत. कविता 23 तारखेला जमा करावयाच्या आहेत. रांगोळीसाठी 23 तारखेला नोंदणी करून 26 तारखेला ती जमा करावयाची आहे. स्पर्धांचे नियम व इतर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव (गोवा विज्ञान उत्सव) सर्वांसाठी खुला असून, सामान्य नागरिक महोत्सवात सहभागी होऊ शकणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

विज्ञान विषयाच्या विविध संकल्पनांवर आधारित उत्सव

या उत्सवामध्ये काही संकल्पना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानातील महत्त्वाचे टप्पे, भारतीय विज्ञानाचा इतिहास, स्वदेशी पारंपरिक शोध व नवकल्पना, विज्ञान साहित्य महोत्सव व विज्ञानातील पुढील 25 वर्षे अशा विविध विषयांवर उपक्रम राबवले जाणार आहेत.

उत्सवातील आकर्षण

सर्वांसाठी मोफत सहभाग नोंदणी, विज्ञान प्रदर्शन, सर्व स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र व सर्व प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमांचे थेट प्रक्षेपण हे उत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे घरी बसून सर्वजण उत्सवाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button