हिजाब वादातील मुस्कानचे नाव आता उर्दू घराला ! मालेगावच्या महापौरांची घोषणा

हिजाब वादातील मुस्कानचे नाव आता उर्दू घराला ! मालेगावच्या महापौरांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील हिजाब (Karnataka Hijab News) वादाचे पडसाद देशभर पसरत आहेत. आता अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या मुस्कान खानचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याची घोषणा मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांनी केली आहे.

कर्नाटकातील हिजाबच्या वादातून (Karnataka Hijab News) मुस्लीम मुलींचा आवाज बनलेल्या मुस्कानच्या धाडसी कृतीला प्रभावित होऊन, ही घोषणा करत असल्याचे त्या म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या की, मुस्कानच्या ठिकाणी जरी हिंदू मुलगी असती तरी हाच निर्णय घेतला असता.

महापौर शेख म्हणाल्या, जानेवारी महिन्यात सुरू झालेला हिजाबचा वाद (Karnataka Hijab News) आता कर्नाटक सरकारला चांगलाच कोंडीत पकडेल. कारण राज्यातील अनेक भागात याचे पडसाद उमटत असून, मुस्लिम मुली हिजाब परिधान करण्याबाबत देशभर आंदोलन करत आहेत. महापौरांच्या या घोषणेनंतर हिजाबच्या वादाने नवे वळण घेतले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही राजकीय संघटनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news