Karnataka ACB : चक्क ड्रेनेज पाइपमधून पडू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा…

Karnataka ACB : चक्क ड्रेनेज पाइपमधून पडू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा…
Published on
Updated on

उत्तर कर्नाटकातील एका सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या घरात ड्रेनेज पाइपमध्ये पैसे लपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Karnataka ACB) कर्नाटकमधील कलबुर्गी येथील कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर छापा टाकला त्यावेळी तेथील प्रकार पाहून अधिकारी चक्रावून गेले. याचा एक व्हिडिओ समोर आला असून अभियंत्याच्या घरातील चक्क ड्रेनेज पाइपमधून छापा टाकणारे अधिकारी पैसे काढताना दिसत आहेत. चक्क पाइपलाईन पैसे लपवून ठेवल्याने अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले.

राज्य सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शांतागौडा एम बिरादार यांच्या कलबुर्गी येथील तीन मजली निवासस्थानावर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Karnataka ACB) छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेजची पाइप कापून त्यातून १३.५ लाख रुपयांची रोख रक्कम बाहेर काढली. पाइपलाइन कापल्यानंतर त्यातून पैसे बाहेर पडू लागले. ही रक्कम जप्त करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाइपच्या खाली बादली लावली होती. त्यात पैसे जमा करुन घेतले. सदर अभियंत्याने घरातील सीलिंगमध्येही चलनी नोटाही लपवल्या होत्या, अशी माहिती एसीबीच्या सुत्रांनी दिली. पाइप आणि सिलिंगमधून जप्त केलेली एकूण रोख रक्कम ५४.५ लाख रुपये एवढी आहे.

अभियंता बिरादार यांच्या मालकीची दोन घरे आहेत. त्यांच्याकडे पाच वाहने, ३६ एकर शेतजमीन आणि सोन्याचे दागिने एवढी मालमत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. पण पहिल्यांदाच ड्रेनेज पाइपमध्ये रोख रक्कम लपवून ठेवल्याचे आढळून आल्याचे एसीबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बिरादर याच्यासह अन्य १४ अधिकाऱ्यांच्या ६८ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. १५ अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यात १६.५ कोटी किलो सोने, ४५ किलो चांदी, कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गदग जिल्ह्याच्या कृषी विभागातील संयुक्त संचालक टीएस रुद्रेशाप्पा यांच्याकडे ९ किलो सोने, ३ किलो चांदी, १६ लाख रोख रक्कम सापडली. त्यात सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. भ्रष्टाचारासंदर्भात लोकांच्या तक्रारी आल्यानंतर एसीबीने ही कारवाई केली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं | Story of Blind Wrestler

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news