किरकोळ वादावरून बेपत्ता मुलाचा कर्जत पोलिसांनी पर राज्यामध्ये जाऊन घेतला शोध

किरकोळ वादावरून बेपत्ता मुलाचा कर्जत पोलिसांनी पर राज्यामध्ये जाऊन घेतला शोध

Published on

गणेश जेवरे

कर्जत, पुढारी वृत्तसेवा: घरामध्ये किरकोळ वाद होतो मात्र तो सहन न झाल्याने त्याक्षणी घर सोडून थेट मध्यप्रदेश मध्ये गेलेल्या मुकुंद परभणीकर (बनावट नाव) याचा शोध कर्जत पोलीस लावतात. हे करताना कर्जत ते मध्यप्रदेश हा शेकडो मैल चा प्रवास, मोबाइल बंद, तपासात अनेक अडथळे अंगावर शहारे आणणार्‍या या शोध मोहीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, 'कर्जत येथे राहणारा मुकुंद परभनिकर (बनावट नाव) हा अवघ्या १९ वर्षांचा युवक किरकोळ कारणावरून त्याचा घरातील व्यक्तींशी वाद झाला. हा वाद त्याने इतका मनाला लावून घेतला की त्याने आपले राहते घरच सोडले. रागाच्या भरात कुठे गेला? कुणाकडे गेला? कुणालाच काही माहीत नाही. कुटुंबातील व्यक्तींनी नातेवाईक, मित्र-परीवार सगळीकडे चौकशी-शोधाशोध केली, शेकडो फोनकॉल फिरले मात्र काहीही तपास लागला नाही.

आता सगळे पर्याय थांबले होते. ही घटना कर्जत पोलीस ठाण्यापर्यंत गेली. कुटुंबियांकडून मुलगा हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. कुटुंबातील व्यक्तींच्या मनात असलेली काळजी, भीती, संशय हे सगळं पोलीस निरीक्षक यादव यांनी पाहिलं. 'काळजी करू नका मी बघतो' हे नेहमीप्रमाणे त्यांचं ठरलेलं छोटं वाक्य कुटुंबीयांना दिलासा देणारं ठरलं.

आता सुरू झाली ती श्री यादव यांची तपास यंत्रणा. यादव यांच्या आदेशाने बेपत्ता असलेल्या युवकाचे ठिकानाबाबत माहिती मिळवली. तो इंदौर-मध्यप्रदेश मध्ये असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पुढची माहिती मिळत नव्हती. नेमके काय झाले असावे? मुलगा सुखरूप आहे की नाही? त्याच्याबरोबर काय अनर्थ तर घडला नसेल ना? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना तोंड फुटत होते. या सर्व आव्हानाला तोंड देत किचकट तपासाचा 'यादव पॅटर्न' खऱ्या अर्थाने सुरु झाला होता.

यादव यांनी मिळालेल्या माहितीवर तात्काळ पोलीस पथक रवाना केले. तपासात असे आढळून आले की, युवक हा दौंड येथून रेल्वेने इंदौर-मध्यप्रदेश येथे पोहोचला होता. याच रेल्वे प्रवासात नव्याने झालेल्या ओळखीच्या आधारे त्याच शहरातील कंपनीत तो काम करत होता. मोबाईल बंद करून त्या ठिकाणी तो राहत होता. कर्जत पोलिसांनी संपुर्ण शहरात शोध मोहीम सुरू केली. स्थानिक चौकशी, दुकानदार, हॉटेल आदींकडे फोटो दाखवून कसून चौकशी केली.

या चौकशीत सदरचा युवक हा संबंधित ठिकाणी राहत असल्याची खात्री झाली. त्यानंतर या तपासास अधिक गती देऊन होम-टू-होम चौकशी करण्यात आली. या चौकशीत हरवलेल्या मुकुंदला शोधण्यात कर्जतच्या पथकाला यश आले. आता तपास थांबला होता. पिथमपुर मध्यप्रदेश येथून मुकुंद ला कर्जत येथे आणण्यात आले व त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. कुटुंबियाच्या ताब्यामध्ये त्याला देतात सर्वांच्या अश्रूंना बांध फुटला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक संभाजी वाबळे, अर्जुन पोकळे आदींनी केली आहे.

चित्रपटाला साजेल असाच कर्जत पोलिसांचा तपास

'चित्रपटामध्ये अभिनय करताना हरवलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवून त्याचा शोध घेतला जातो. विशेष म्हणजे चित्रपटातील हरवेलेली व्यक्ती काही मिनिटात सापडतेही मात्र कर्जत पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन दुकाने, व्यावसायिक, प्रत्येक घरात फोटो दाखवून माहिती घेतली. मोबाईल बंद असुन शेवटच्या लोकेशनवर सुरू असलेली शोधमोहीम तपास लागल्यावरच थांबली हा सर्व प्रसंग अगदी चित्रपटाला साजेल असाच आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news