भवानीपेठेत इलेक्ट्रीकचे काम करताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट

भवानीपेठेत इलेक्ट्रीकचे काम करताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भवानी पेठेत रविवारी सायंकाळी अचानक स्फोटाचा अवाज झाल्याने पोलिसांची धांदल उडाली. समर्थ पोलिस, गुन्हे शाखेचे पोलिस, तसेच इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याचे तपासनंतर दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा प्रकार भवानी पेठेतील विशाल सोसायटी येथे 13 जून ला सायंकाळी घडला. संबंधीत व्यक्ती वॉशींगमशीन दुरूस्तीचे काम करत असताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. यावेळी खिडकीच्या काचा फुटल्या. मात्र या अपघातात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती देण्यात आली.

याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी वॉशिंगमशीनेचे काम करताना हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांसह विविध पथकांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारे घातपाताचे किंवा संशयास्पद कृत्य आढळले नसल्याचे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news