इस्लामपुरात घरफोडी; ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील विद्याप्रसाद कॉलनीतील घराचा कडी-कोयंडा उचकटून घरातील रोकड, सोन्याचा चांदीचे दागिने असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा चोरीचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला. घरमालक शशिकांत शेखर यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शेखर हे शनिवारी दुपारी कुटुंबासह गावी गेले होते. सायंकाळी 6 वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांना स्वयंपाकघराच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटलेला दिसला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. लोखंडी कपाटातील एक तोळ्याच्या टॉप्स, अर्ध्या तोळ्याचा टिक्का, अर्ध्या तोळ्याचे चेन, अर्ध्या तोळ्याची अंगठी, मनगटे, कानातील फुले, चांदीचे पैंजण, बे्रसलेट आणि 5 हजार रुपयांची रोकड, असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दिवसा घडलेल्या या घरफोडीने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरात चोर्‍यांचे सत्र सुरू असताना मात्र पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. शहरात मोटारसायकल, मोबाईल चोरीचे प्रकारही वाढले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news